ओटीटीवर Aashram 3 चा डंका; बाबा निरालाच्या 'लीला' पाहण्यासाठी भक्तांची गर्दी

बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलची वेब सीरिज 'Ek Badnaam Aashram 3' अखेर प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर प्रदर्शित झाली आहे.

Updated: Jun 7, 2022, 12:05 PM IST
ओटीटीवर Aashram 3 चा डंका; बाबा निरालाच्या 'लीला' पाहण्यासाठी भक्तांची गर्दी title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलची वेब सीरिज 'Ek Badnaam Aashram 3' अखेर प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर प्रदर्शित झाली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर एमएक्स प्लेयरवर प्रदर्शित करण्यात आली आहे. बाबा निरालाच्या सिरीजने ओटीटी प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घातला आहे. बाबांच्या दर्शनासाठी भाविकांनी बराच वेळ वाट पाहिली असे नेटकरी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत आहेत. यावेळी जुन्या स्टार्सशिवाय अनेक नवीन लोकांचाही प्रवेश झाला आहे. अवघ्या 32 तासांत ही मालिका 100 मिलियन लोकांनी पाहिली आहे.

बाबा निरालाचा ओटीटीवर धुमाकूळ

OTT वर बाबाचा डंका वाजतोय. पहिल्या दोन सुपरहिट सीझननंतर प्रेक्षकांमध्ये 'आश्रम 3' ची प्रचंड क्रेझ होती. ही भारतीय OTT वर सर्वाधिक पाहिली जाणारी मालिका ठरली.

ही मालिका एक नवा विक्रम मोडणार आहे असे दिसते. आश्रमच्या पहिल्या दोन सीझनला जवळपास 160 मिलीयन व्ह्यूज मिळाले.  सीझन 3 ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सहा तासांच्या आत, हा शो संपूर्ण भारतात YouTube वर नंबर 1 वर ट्रेंड करत होता.

'आश्रम 4' चा टीझर नुकताच रिलीज झाला

नुकतेच निर्मात्यांनी 'आश्रम 4' चा टीझर देखील रिलीज केला आहे. प्रकाश झा दिग्दर्शित या मालिकेच्या नव्या सीझनच्या टीझरने आता प्रेक्षकांमधील उत्सुकता द्विगुणित केली आहे. 'आश्रम 4' ला 'बदनाम आश्रम सीझन 4' असे नाव देण्यात आले आहे. यात पुन्हा बॉबी देओल, चंदन रॉय, अदिती आणि त्रिधा चौधरी मुख्य भूमिकेत दिसत आहेत.

'आश्रम 4' चा टीझर मधला पम्मी बाबा निराला यांच्य आश्रमात दिसत आहे. 'आश्रम 4' च्या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.

'आश्रम 3'मध्ये दिसली ईशा

'आश्रम 3' बद्दल सांगायचे तर, अपेक्षेप्रमाणे ती रिलीज होताच प्रेक्षकांचा तितकाच उदंड प्रतिसाद मिळतोय. ईशा गुप्तानेही या सीझनमध्ये प्रवेश केला आहे. या मालिकेत तो आणि बॉबी देओलमध्ये खूप बोल्ड आणि हॉट सीन्स पाहायला मिळत आहेत. ईशाच्या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांमध्ये आधीच उत्सुकता निर्माण केली होती.