‘साज ह्यो तुझा’सोशल मीडियावर होतोय व्हायरल

युट्यूबवर हे गाणं रसिकांच्या पसंतीस येत असून आतापर्यंत कमी वेळात हजारो व्ह्यूज त्याला मिळाले आहेत. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Nov 18, 2017, 06:56 PM IST
‘साज ह्यो तुझा’सोशल मीडियावर होतोय व्हायरल  title=

मुंबई : 'साज ह्यो तुझा' हे गाणे सध्या सोशल मीडियावर मोठ्या व्हायरल होत आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'ख्वाडा' या सिनेमानंतर दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे बबन सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

युट्यूबवर हे गाणं रसिकांच्या पसंतीस येत असून आतापर्यंत कमी वेळात हजारो व्ह्यूज त्याला मिळाले आहेत. 

या दोन गायिका एकत्र 

आपल्या जादुई आवाजाने बॉलीवूडला वेड लावणाऱ्या दोन गायिका पहिल्यांदाच एकत्र गाणार आहेत. सुनिधी चौहान आणि शाल्मली खोलगडे या दोघींनी या सिनेमासाठी पार्श्वगायन केले असून संगीत ओंकारस्वरूप यांचे आहे. प्रा. डॉ. विनायक पवार यांनी गीत लेखन केले आहे. 

हे आहेत कलाकार 

या सिनेमात भाऊसाहेब शिंदे, गायत्री जाधव, शीतल चव्हाण, देवेंद्र गायकवाड, योगेश डिंबळे, अभय चव्हाण, प्रांजली कंझारकर, मृणाल कुलकर्णी, कृतिका तुळसकर, सीमा समर्थ ही कलाकार मंडळी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. 

२९ डिसेंबरला प्रदर्शित 

बबन हा सिनेमा २९ डिसेंबर संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. युट्यूबवर हिट ठरत असलेल्या गाण्यानंतर सिनेमा कसा असेल याबाबत आता रसिकांच्या मनात उत्सुकता लागली आहे.