मुंबई : बांग्ला सिनेसृष्टीची अभिनेत्री आणि टीएमसीच्या चर्चेत असलेल्या खासदार नुसरत जहां (Nusrat Jahan) गरोदर आहेत? बांग्ला देशी लेखीका तस्लीमा नसरीन यांनी नुसरत जहां यांच्या प्रेग्नेंसीबद्दल आणि पतीसोबत असलेल्या नात्याबद्दल एक फेसबूक पोस्ट लिहिली आहे. ज्यानंतर नुसरत जहां यांच्या प्रेग्नेंसी आणि नात्याबद्दल जोरदार चर्चच रंगत आहे. मीडिया रिपोर्टनुसार नुसरत जहां सहा महिन्यांच्या गरोदर आहेत. परंतु याबद्दल त्यांच्याकडून किंवा त्यांच्या मीडिया टीमकडून कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही.
शिवाय नुसरत जहां यांच्या सासरच्या मंडळींना देखील त्यांच्या गरोदरपणाबद्दल काही कल्पना नाही. नुसरत जहां यांचे पती निखिल जैन यांनी याप्रकरणी मोठा खुलासा केला आहे. निखिल जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार त्याचं लग्न संपू शकतं. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात नुसरत यांनी पतीचं घर सोडलं आहे. त्या सध्या त्यांच्या आई-वडिलांसोबत राहतात.
मीडिया रिपोर्टनुसार अभिनेत्री-खासदार नुसरत जहांचं वैवाहिक जीवन संकटात आलं आहे. यश दासगुप्ता सोबत वाढलेली जवळीक यामुळे नुसरत जहांच्या विवाहित जीवनात अडचणी निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. नुसरत जहां आणि यश दासगुप्ता यांची भेट चित्रपटाच्या सेटवर झाली होती. दोघेही एकमेकांच्या घरी जातात. नुसरत लवकरच निखिलला घटस्फोट घेणार असल्याचं कळत आहे.
काय म्हणाल्या तस्लीमा नसरीन
'दोघांना सहा महिन्यांपासून दूर केलं आहे. पण अभिनेत्री नुसरत यांना यश नावाच्या अभिनेत्यासोबत प्रेम झालं आहे. लोक त्याला मुलाचा बाप मानत आहेत. निखिलला नाही. ही अफवा आहे की सत्य माहिती नाही. पण निखिल आणि नुसरतचं घटस्फोट चांगलं नाही. '
दरम्यान, २०१९ मध्ये टीएमसीकडून निवडणूक लढवून त्या खासदार झाल्या. बिझनसमन निखील जैन सोबत विवाह केल्यानंतर त्या चर्चेत देखील आल्या. विवाहानंतर तिचे अनेक फोटो समोर आले होते. ज्यामध्ये दोघेही हिंदू आणि मुस्लीम सण साजरा करताना दिसले. मात्र आता त्यांच्या वैवाहिक जीवनात संकट आलं आहे.