पाण्याचा घोट जीवावर बेतला...! प्रसिद्ध लेखिकेने घेतला अखेरचा श्वास

मराठी मनोरंजन क्षेत्रामधून गेल्या काहि दिवसांपासून अनेक वाईट बातम्या समोर येत आहेत.

Updated: Aug 9, 2022, 11:07 PM IST
पाण्याचा घोट जीवावर बेतला...! प्रसिद्ध लेखिकेने घेतला अखेरचा श्वास title=

मुंबई : मराठी मनोरंजन क्षेत्रामधून गेल्या काहि दिवसांपासून अनेक वाईट बातम्या समोर येत आहेत. अनेक कलाकारांचं निधनाच्या बातम्या समोर आल्या होत्या. आता अशीच एक बातमी समोर येत आहे. 

प्रसिद्ध कवियत्री व उत्कृष्ट चित्रकार माधुरी गयावळ यांचं काहि दिवसांपूर्वी निधन झाल्याची बातमी समोर आली आहे.  त्यांचं वय केवळ 58 वर्ष इतकं होतं. त्यांच्या मृत्यूचं कारण समोर आल्यानंतर मात्र अनेकांना धक्का बसला आहे. एका काव्य संमेलनाचं सूत्रसंचालन करत असतानाच त्यांना मृत्यूने गाठलं.

माधुरी गयावळ या आम्ही प्रसिद्ध लेखिका या संस्थेच्या एका कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत होत्या.  कार्यक्रम सुरू झाल्यानंतर त्यांनी काही कवित्रींना कविता वाचनासाठी देखील बोलवलं. एका कवित्रीने कविता म्हटल्यानंतर पुढच्या कवित्रींना त्या बोलवत होत्या. मात्र, याच वेळेस त्यांना अचानक खोकला आला.

त्यानंतर त्यांच्या सहमैत्रिणींनी त्यांना सांगितलं की, तुम्ही पाणी पिऊन या यानंतर माधुरी या पाणी पिण्यासाठी गेल्या. मात्र त्या परत आल्याच नाही. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. माधुरी गयावळ या वेगवेगळ्या संस्थांवर लेखिका म्हणून कार्यरत होत्या.

माधुरी गयावळ या ‘आम्ही सिद्ध लेखिका’ संस्थेच्या सचिव होत्या. तसंच त्या साहित्यदीप प्रतिष्ठानशी निगडित होत्या. त्यांचा  ‘मनांगण’ हा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. त्यांच्या आकस्मिक मृत्यूबद्दल कलाक्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात्त पती, मुलगा, सून व नात असा परिवार आहे.