सलमान खान वाढदिवसा दिवशीच अडकणार लग्नबंधनात? फोटो शेअर करत दिली गुडन्यूज

सलमान खानने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सलमान खान खूपच डॅशिंग दिसत आहे. मात्र या फोटोत सलमान खानसोबत  एक महिलाही दिसत आहे. 

Updated: Oct 8, 2023, 02:16 PM IST
सलमान खान वाढदिवसा दिवशीच अडकणार लग्नबंधनात? फोटो शेअर करत दिली गुडन्यूज title=

Salman Khan Latest Social Media Post : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या 'टायगर 3' या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. सलमान खानचा हा चित्रपट दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. अलीकडेच निर्मात्यांनी या सिनेमाची घोषणा केली आहे.  'टायगर 3' चित्रपटाचा ट्रेलर 16 ऑक्टोबरला म्हणजेच सोमवारी रिलीज होणार आहे. सलमान खानच्या टायगर फ्रँचायझीचे दोन्ही चित्रपट चाहत्यांना खूप आवडले होते आणि आता या फ्रँचायझीच्या तिसऱ्या चित्रपटाची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. दरम्यान, सलमान खानने सोशल मीडिया पोस्टने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. सलमान खानने काय पोस्ट केलं आहे ते पाहूया.

सलमान खानने शेअर केली ही पोस्ट 
सलमान खानने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सलमान खान खूपच डॅशिंग दिसत आहे. मात्र या फोटोत सलमान खानसोबत  एक महिलाही दिसत आहे. जी पाठमोरी उभी आहे. अभिनेत्याचा हा फोटो पाहून चाहते अनेक प्रकारचे तर्कवितर्क लावत आहेत. तर अनेकजण त्याची ही पोस्ट पाहून त्याच्या लग्नाची अटकळ बांधत आहेत. सलमान खानचा हा फोटो पाहून लोक त्याच्या लग्नाबद्दल अंदाज लावत आहेत. सोशल मीडिया यूजर्सनी सलमान खानच्या फोटोवर जोरदार कमेंट्सचा वर्षाव केला आहे.  

एका यूजरने कमेंट करत लिहिलं आहे की, 'भाई और जान' तर अजून एका यूजरने लिहिलं आहे की, 'तु लग्न केलंस का?' तर अजून एका यूजरने लिहिलं की, 'वहिनीचा चेहरा लवकरच समोर येणार आहे.' तर अजून एका यूजरने लिहिलं की, 'भाई, तु लग्न करण्याच्या मूडमध्ये आहेस का?' तर अजून एका यूजरने लिहिलं आहे की, 'भाई, तु लग्न करणार आहेस का?'

'टायगर 3' चित्रपटाची स्टारकास्ट
सलमान खानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो मनीष शर्मा दिग्दर्शित 'टायगर 3' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. सलमान खान शेवटचा 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट 2023 च्या ईदला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता