मुंबई : आपल्या सौंदर्यामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री भूमिका चावला हीने सलमान खानसोबत 2003 मध्ये 'तेरे नाम' या सिनेमातून डेब्यू केलं आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. मात्र पहिल्या हिट सिनेमानंतर भूमिका बॉलिवूडमध्ये काही खास वेगळे सिनेमे करू शकली नाही. त्यानंतर तिने साऊथ इंडस्ट्रीकडे आपला रोख वळवला.
भूमिका चावलाचा जन्म 21 ऑगस्ट 1978 मध्ये दिल्लीत झाला. आर्मी कुटुंबात जन्मलेल्या भूमिकाने आपलं शिक्षण दिल्लीतच पूर्ण केलं. अभिनयात काम करण्याची इच्छा असलेल्या भूमिकाने 1997मध्ये मुंबईत येण्याचा निर्णय घेतला. भूमिकाला जाहिरात आणि हिंदी म्युझिक अल्बममध्ये काम करण्याची संधी मिळाली. अनेक जाहिराती केल्यानंतर भूमिकाने अदनान सामी आणि उदित नारायण यांच्या अल्बममध्ये भूमिका दिसली. 2000 मध्ये भूमिका चावलाने 'युवाकुडु' या साऊथ सिनेमांत काम केलं. तिचा दुसरा सिनेमा तेलगुमध्ये असून 'खुशी' असं या सिनेमाचं नाव होतं. या सिनेमाकरता तिला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला.
2003 मध्ये बॉलिवूडकडे वळलेल्या भूमिकाने तेरे नाम सिनेमांत काम केलं. 2004 मध्ये तिने पुन्हा सलमान खानसोबत 'दिल ने जिसे अपना कहा' या सिनेमात काम केलं. प्रिती झिंटा देखील या सिनेमांत होती मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फार चालला नाही. सिनेमांत पुरेसं यश न मिळाल्यामुळे भूमिकाने 2007 साली योगा शिक्षक भरत ठाकूरसोबत लग्न केलं. लग्नाच्या अगोदर हे दोघं जवळपास 4 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. भूमिका, भरत यांच्याकडूनच योगाचे शिक्षण घेत होती. या दरम्यान या दोघांची चांगली मैत्री होती. दोघांनी नाशिकमध्ये गुरूद्वारात लग्न केलं