Ajay Devgn Ask Bholaa: बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) सध्या आपल्या आगामी 'भोला' (Bholaa) चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटातून अजय देवगण पुन्हा एकदा अॅक्शन करताना दिसणार आहे. चित्रपटात अजय देवगणसह तबूदेखील (Tabu) मुख्य भूमिकेत आहे. दरम्यान अजय देवगणने प्रमोशनमधून विश्रांती घेत ट्विटरला (Twitter) चाहत्यांसाठी #AskBholaa सेशन आयोजित केलं होतं. यावेळी एका चाहत्याने अजय देवगणला तू वारंवार तबूसोबत चित्रपट का करतोस? अशी विचारणा केली. त्यावर अजय देवगणने भन्नाट उत्तर दिलं.
अजय देवगणने ट्विटरला चाहत्यांसाठी प्रश्नोत्तराचं सेशन आयोजित केलं होतं. यावेळी त्याने चाहत्यांना तुम्ही हवे ते प्रश्न विचारा असं आवाहन केलं होतं. यादरम्यान एका चाहत्याने अजय देवगणला तू सतत तबूसोबत चित्रपट का करतोस? अशी विचारणा केली. त्याने म्हटलं की 'सर्व चित्रपट तबूसोबत करत आहेस. यामागे काही खास कारण'. त्यावर अजय देवगणने 'तिच्या तारखा मिळाल्या' असं उत्तर दिलं.
तबू आणि अजय देवगणने दृश्यम. गोलमाल अगेन, दे दे प्यार दे, विजयपथ, हकिकत अशा अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. त्यात आता 'भोला' चित्रपटातही ही जोडी एकत्र झळकणार आहे.
Dates mil gaye uske https://t.co/rxJnQYpiMM
— Ajay Devgn (@ajaydevgn) March 14, 2023
दरम्यान, या ट्विटर सेशनदरम्यान चाहत्यांनी अजय देवगणला अनेक वेगवेगळे प्रश्न विचारले. एका चाहत्याने त्याला 'भोला चित्रपट किती कमाई करेल असं वाटतं' अशी विचारणा केली. त्यावर अजय देवगणने 'पैशांचं माहिती नाही, पण तुमचं प्रेम भरपूर कमावेल अशी आहे' असं उत्तर दिलं.
Paison ka pata nahi, umeed karta hoon aapka pyaar khoob kamaye https://t.co/L6LWLI8Rws
— Ajay Devgn (@ajaydevgn) March 14, 2023
तबूबद्दल बोलायचं गेल्यास यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत तिचं नान घेतलं जातं. तब्बूने वेगवेगळ्या धाटणीच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं असून, तिच्या अभिनयाचं नेहमी कौतुक केलं जातं. मकबूल, माचिस, द नेमसेक, लाइफ ऑफ पाय, अंदाधून, हैदर, दृश्यम, हेरा फेरी अशा अनेक हिट चित्रपटांमध्ये तब्बू झळकली आहे. यावर्षी तब्बूचे दृश्यम 2, कुत्ते आणि भूल भुलैय्या 2 हे चित्रपट प्रदर्शित झाले.
दरम्यान अजय देवगणसाठीही हे वर्ष चांगलं गेलं आहे. दृश्यम 2, आरआरआर आणि गंगूबाई काठीवाडी चित्रपटात तो झळकला. हे तिन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजले. तसंच तान्हाजी चित्रपटासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला.