मुंबई : इंटिमेट सीन म्हटलं की अनेकांच्याच भुवया उंचावतात. चित्रपट म्हणा किंवा एखादी वेब सीरिज, कथानकाच्या आवश्यकतेनुसार काही दृश्यांची जोड कलाकृतीला दिलेली असते. प्रणयदृश्य, इंटिमेट सीन हासुद्धा त्याचाच एक भाग.
सध्या इंटिमेट सीनबद्दल एका अभिनेत्यानं केलेलं वक्तव्य एकाएकी सर्वांचं लक्ष वेधत आहे.
हा अभिनेता म्हणजे परफेक्शनिस्ट आमिर खान याचा भाचा, इमरान खान.
2009 दरम्यानच्या मुलाखतीत त्यानं एका वाहिनीला दिलेल्या माहितीमध्ये 'लक' या चित्रपटातील अनुभव सांगितला.
हा अनुभव होता इंटिमेट सीनच्या वेळचा. चित्रपटामध्ये इमरानसोबत अभिनेत्री श्रृती हासन हिनंही स्क्रीन शेअर केली होती.
त्याबाबत सांगताना तो म्हणाला, 'तिच्यासोबत काम करण्याचा अनुभव छानच होता. कारण ती माझी बालपणापासूनची मैत्रीण होती.
पण, इंटिमेट सीनदरम्यान माझ्यावर फारच दडपण आलं होतं. ती माझी चांगली मैत्रीण असल्या कारणानं असा सीन तिच्यासोबत करणं, फारच कठीण होतं.'
इंटिमेट सीनबाबत माहिती होताच यासाठी श्रुतीला तयार कसं करावं हाच प्रश्न त्याच्या मनात घर करुन गेला होता.
'ती मला, माझ्या गर्लफ्रेंड्सनाही गेल्या 15 वर्षांपासून ओळखतेय. त्यामुळं रोमँटिक सीनचा विचार त्यात तोही श्रुतीसोबत यानंच माझी अवस्था वाईट झाली होती', असं म्हणत त्यानं मनातील भीती बोलून दाखवली होती.
श्रुती आपल्याबाबत काय विचार करेल हीच चिंता तिला भेडसावत होती.
इम्राननं 2008 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 'जाने तू या जाने ना', Delhi Belly, 'आई हेट लव स्टोरीज', 'एक मैं और एक तू' अशा चित्रपटांतून त्यानं प्रेक्षकांची मनं जिंकली.