'तो' मी नव्हेच... Nude Photo प्रकरणी Ranveer Singh चा गौप्यस्फोट

एक फोटोशूट रणवीरला महागात, आता प्रकरणाला नवं वळण 

Updated: Sep 15, 2022, 11:46 AM IST
'तो' मी नव्हेच... Nude Photo प्रकरणी Ranveer Singh चा गौप्यस्फोट  title=
Bollywood Actor Ranveer singh on Nude Photo says it was Morphed

Ranveer Singh : अभिनेता रणवीर सिंग यानं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचं एक नवं फोटोशूट चाहत्यांच्या भेटीला आणलं होतं. एका मासिकासाठी करण्यात आलेल्या फोटोशूटमधील निवडक फोटो त्यानं शेअर केले. ज्यानंतर त्याचे याच फोटोशूटमधील काही इतरही फोटो प्रचंड व्हायरल झाले. रणवीरचे हे फोटो प्रमाणापेक्षा जास्त चर्चेत येण्याचं कारण, म्हणजे त्याचा Nude Look. 

सदर प्रकरणी मुंबई पोलिसांत रणवीरविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली होती. ज्यानंतर आता अभिनेत्यानं या प्रकरणी आपला जबाब नोंदवल्याचं कळत आहे. प्रायवेट पार्ट दिसल्याच्या मुद्द्यावरून ज्या फोटोमुळं हे रणकंदन माजलं त्यावर आता रणवीरनंच मौन सोडलं आहे. पण, त्याचा दावा भुवया उंचावत आहे. (Bollywood Actor Ranveer singh on Nude Photo says it was Morphed)

अश्लीलतेचा आरोप करत रणवीरच्या ज्या फोटोमुळं वादानं तोंड वर काढलं होतं, त्यावर मत नोंदवताना आपल्याकडून शेअर करण्यात आलेल्या त्या सात फोटोंमध्ये ज्या फोटोमुळं वाद झाला आहे त्याचा समावेशच नव्हता. किंबहुना तो फोटो Morphed असल्याचाही दावा रणवीरनं केला. 

वाचा : बॉलिवूडविषयी Bahubali फेम रम्याचं धक्कादायक वक्तव्य, दाक्षिणात्य कलाकारांना झालंय तरी काय?

तो मी नव्हेच... असं म्हणणाऱ्या रणवीरचा हा दावा ऐकल्यानंतर पोलिसांनी आता तो फोटो पुढील तपासणीसाठी पाठवला आहे, जिथं तो खरंच मॉर्फ करण्यात आला होता की नाही हे स्पष्ट होणार आहे. 

Ranveer Singh nude photoshoot case: Praised by the world, derided in his  homeland – here's why we need to evolve and identify what's real obscenity  [Opinion]

दरम्यान, रणवीरनं फोटोशूटदरम्यानचे फोटो आपल्याला दिल्याचं सांगत त्याच्या (ranveer singh instagram) इन्स्टा पोस्टही तपासण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. यामध्ये ज्या फोटोमुळं तक्रार करण्यात आली होती, तो मात्र कुठेच दिसला नाही अशी माहिती सदर प्रकरणाशी संलग्न पोलीस अधिकाऱ्यांनी दिली (Mumbai police).