'मी रात्री उशिरा झोपलो होतो, अचानक...,' सलमानने सांगितलं गोळीबाराच्या रात्री नेमकं काय घडलं? उलगडला सगळा घटनाक्रम

Salman Khan Firing Case: गॅलॅक्सीवर (Galaxy) झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांची (Mumbai Police) चार जणांची टीम सलमान खान (Salman Khan) आणि त्याचा भाऊ अरबाज खानचा (Arbaz Khan) जबाब नोंदवण्यासाठी पोहोचली होती. या टीममध्ये क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्याचाही समावेश होता.   

शिवराज यादव | Updated: Jun 13, 2024, 03:53 PM IST
'मी रात्री उशिरा झोपलो होतो, अचानक...,' सलमानने सांगितलं गोळीबाराच्या रात्री नेमकं काय घडलं? उलगडला सगळा घटनाक्रम title=

Salman Khan Firing Case: बॉलिवूड अभिनेता सलमान खानचं मुंबईतील निवासस्थान गॅलॅक्सीवर (Galaxy) 14 एप्रिलला झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) सलमान आणि त्याचा भाऊ अरबाज खानचा (Arbaz Khan) जबाब नोंदवला आहे. मुंबई पोलिसांची चार जणांची टीम सलमान खान (Salman Khan) आणि अरबाजचा जबाब नोंदवण्यासाठी पोहोचली होती. या टीममध्ये क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्याचाही समावेश होता. सलमानने आपल्या जबाबात रात्री गोळीबाराचा आवाज ऐकून आपण जागे झालो होतो असं सांगितलं आहे. बाईकवरुन आलेल्या दोन आरोपींकडून हा गोळीबार करण्यात आला होता. लॉरेन्स बिष्णोई याने सलमान खानला ठार करण्याच्या उद्देशाने या शूटर्सना सुपारी दिली होती. 

4 जूनला पोलिसांचं पथक सलमान खानच्या निवासस्थानी जबाब नोंदवण्यासाठी दाखल झालं होतं. दोघांचीही 6 तास चौकशी करण्यात आली. सलमान खानने यावेळी पोलिसांना आपला जीव धोक्यात आहे याची जाणीव झाली असं सांगत मुंबई पोलिसांचे आभार मानले. 

सलमान खानने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलं की, "त्या रात्री पार्टी असल्याने रात्री उशिरा झोपलो होतो". गोळ्यांचा आवाज ऐकल्यानंतर सलमान खानला जाग आली असं सलमानने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसंच जाग आल्यानंतर बाल्कनीत जाऊन पाहिलं असता, बाहेर त्याला कोणीच दिसलं नाही असंही पोलिसांनी सांगितलं आहे. 

अरबाज खान त्यावेळी जुहूमधील निवासस्थानी होता. लॉरेन्स बिष्णोई गँगकडून याआधी मिळालेल्या धमक्यांची  आपल्याला जाणीव होती असं अरबाजने पोलिसांना सांगितलं. पोलीस 3 तास सलमान खानचा जबाब नोंदवत होते. तर अरबाजची 2 तास चौकशी करण्यात आली. दोघांना यावेळी 150 प्रश्न विचारण्यात आले असं पोलिसांना सांगितलं आहे. 

जेव्हा गोळीबार झाला तेव्हा सलीम खानदेखील वांद्रे येथील निवासस्थानी होते. पण त्यांच्या वयामुळे त्यांचा जबाब नोंदवण्यात आला नव्हता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, क्राईम ब्रांच गरज पडल्यास त्यांचा जबाब नोंदवणार आहे. 

14 एप्रिलला सलमान खानच्या घराबाहेर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केल्यानंतर सहा जणांना अटक करण्यात आली आहे. विकी गुप्ता आणि सागर पाल यांना गुजरातमध्ये तर अनुज थापन आणि अन्य एका व्यक्तीला 26 एप्रिल रोजी पंजाबमधून ताब्यात घेण्यात आले होते. अनुज थापनचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉरेन्स बिष्णोई टोळीने महाराष्ट्रातील पनवेल येथील सलमान खानच्या कारवर हल्ला करण्याचा कट रचला होता. सलमान खानचं पनवेलला फार्महाऊस आहे . पाकिस्तानी शस्त्रास्त्र पुरवठादाराकडून मिळालेल्या शस्त्रांनी ते सज्ज होते. तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई, त्याचा कॅनडास्थित चुलत भाऊ अनमोल बिश्नोई आणि सहकारी गोल्डी ब्रार याने एका पाकिस्तानी शस्त्रास्त्र विक्रेत्याकडून एके-47, एम-16 आणि इतर हाय-कॅलिबर शस्त्रे घेतल्याची माहिती आहे.