मुंबई : दैनंदिन वेळापत्रकातून वेळ काढत आणि आपल्या व्यग्र दिनचर्येला शह देत बॉलिवूडमधील काही अघाडीच्या कलाकारांनी चक्क मुलांच्या शाळेत हजेरी लावली. निमित्त होतं ते म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलनाचं. बिग बी अमिताभ बच्चन यांच्यापासून किंग, शाहरुख खान यांच्यापर्यंत बऱ्याच सेलिब्रिटींनी त्यांच्या मुलांच्या शालेय कार्यक्रमाला हजेरी लावली.
सोशल मीडियावर या कार्यक्रमातील अनेक व्हिडिओ व्हायरल झाले. कुठे आराध्या बच्चन, म्हणजेच अमिताभ बच्चन यांची नात महिला सबलीकरणाच्या मुद्द्यावर मोठ्या आत्मविश्वासाने भाषण करताना दिसली, तर कुठे शाहरुखचा मुलगा अब्राम हासुद्धा या कार्यक्रमात धमाल करताना दिसला.
फक्त अब्रामच नव्हे, तर खुद्द शाहरुखही या कार्यक्रमादरम्यान, त्याच्यातील लहान मुलाला बाहेर येण्यापासून रोखू शकला नाही. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये शाहरुखचा मुलगा अब्राम हा त्याच्या इतर मित्रांसमवेत व्यासपीठावर नृत्य सादर करताना दिसत आहे. तर, याच व्हि़डिओमध्ये पुढे खुद्द शाहरुखही शाळेतील विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून त्यांच्यासोबत थिरकताना दिसत आहे.
The little kids are amazing! The big kid is just too precious #ShahRukhKhan pic.twitter.com/XDFtNazcUE
— Lina (@KingdomKhan4evr) December 22, 2019+
वाचा : 'आम्ही अशा जगात जागे होऊ, जिथे माझा आवाज दाबला जाणार नाही'
हिंदी कलाविश्वातील आपलं वेळापत्रक पाहता शाहरिख कायमच त्याचं काम आणि खासगी आयुष्य, विशेषत: कुटुंबामध्ये समतोल राखताना दिसतो. योग्य वेळी योग्य गोष्टींना तो कायम प्राधान्य देतो. असा हा किंग खान मुलाच्या शालेय कार्यक्रमात धमाल केल्यानंतर आता नव्या वर्षात कोणत्या नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.