जेव्हा भूमी पेडणेकरला विचारलं, कोणासोबत एक रात्र घालवशील की....?

काही महत्त्वाचे आणि काही वादग्रस्त निर्णय़ही घेतात.   

Updated: Aug 31, 2021, 07:47 PM IST
जेव्हा भूमी पेडणेकरला विचारलं, कोणासोबत एक रात्र घालवशील की....?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : जीवनाच्या या प्रवासामध्ये अनेकदा काही जुनाट आणि रटाळ विचारांचा पाठलाग सोडवणं गरजेचं असतं. बॉलिवूड सेलिब्रिटींना या गोष्टी अगदी सहजपणे शक्य होतात, असं म्हटलं जातं. बदलत्या काळानुरुप ही माणसं अतिशय वेगानं परिस्थिती स्वीकारत पुढे जातात, काही महत्त्वाचे आणि काही वादग्रस्त निर्णय़ही घेतात. 

यामुळंच कलाकारांच्या विचारसणीची वारंवार चर्चा होते. जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन इतरांच्यासाठीही महत्त्वाचा ठरतो. अभिनेत्री भूमी पेडणेकर (bhumi pednekar) हिचाही काही गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टीकोन अगदी व्यापक आहे. काही बाबतीत मात्र ती आपल्या मतांवर ठाम दिसते, जिथं तिला आधुक संकल्पनांच्या पूर्ण आहारी जायचं नसतं. 

एका मुलाखतीत याचा प्रत्यय आला होता. ज्यावेळी तिनं रिलेशनशिप, ब्रेकअप, प्रेम याबाबतच्या प्रश्नांची उत्तरं दिली होती. तुला कोणासोबत एक रात्र वेळ घालवायला आवडेल की, दीर्घ काळासाठी नातं टीकवायला आवडेल? असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. यातच वन नाईट स्टँड की, फ्रेंड्स विथ बेनिफिट्स? यापैकी एकाची निवड करण्यास सांगण्य़ात आलं. 

अभिनेत्रीची खादाडी पाहून करण जोहरला धक्का; पाहा विचित्र React होत काय म्हणाला? 

कोणत्याही व्यक्तीशी जवळीक साधायची असल्यास भूमीन वन नाईट स्टँड या पर्यायाऐवजी दीर्घ काळ टीकणारं नातं आणि फ्रेंड्स विथ बेनिफिट्स या पर्यायांची निवड केली. आपण प्रेमात झोकून देतो, असं सांगत तिनं मनापासून प्रेम करण्यावर आपला विश्वास असल्याचं तिनं सांगितलं. शहरी वातावरणात वावरत असली, तरीही काही गोष्टींबाबत मात्र भूमी अगदी ठाम असून, कधीच डगमगत नाही हेच तिच्या या उत्तरातून सिद्ध झालं. कोणत्याही मुलीला आवडेल असंच उत्तर तिनं त्या मुलाखतीत दिलं होतं.