मुंबई: 'पंगा' या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याच्या वेळी अभिनेत्री कंगना रानौतचा एक वेगळा आणि तितकाच दिलखुलास अंदाज पाहायला मिळाला. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींकडून विचारण्यात आलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं देत कंगनाने तिची मतं सर्वांपुढे ठेवली. यातच तिला नागरिकत्व सुधारणा कायद्यावर होणाऱ्या निदर्शनांप्रतीसुद्धा तिचं मत विचारण्यात आलं. ज्या प्रश्नाचं उत्तर देताना आपल्याला हा वेळही पुरणार नाही, अशा शब्दांत तिने सुरुवात केली.
सर्वप्रथम निदर्शनांमध्ये हिंसा झाली नाही पाहिजे असं ठाम मत तिने मांडलं. ज्यानंतर फक्त ३-४ टक्के जनताच कर देते. इतर सारे त्याच करावर अवलंबून असतात, असं सांगत निदर्शनांदरम्यान होणाऱ्या जाळपोळीला तिने निषेध केला. जाळपोळ करण्याचा तुम्हाला कोण हक्क देतं, असा प्रश्नही तिने उपस्थित केला. एकिकडे भूकबळी जात असताना दुसरीकडे अशा ७०-८०स लाख रुपये किंमतीच्या बसची जाळपोळ केली जाणं योग्य नसल्याचा मुद्दा तिने मांडला.
'लोकशाहीच्या नावाखाली आपण अद्यापही कुठेतरी पारतंत्र्याच्याच काळात वावरत आहोत. त्यावेळी आपल्यावर शस्त्रांच्या बळावर जनतेला धाक्यात ठेवलं जा होतं. ज्याचा निषेध करण्यासाठी करचुकवेपणा करण, देश बंदची हाक देणं हे त्यावेळी योग्य होतं. आता म्हणावं तर तुमचा नेता इटली किंवा जपानहून आलेला नाही. ते लहानातील लहान ठिकाणहून आलेलेच नेते आहेत. जे स्वत:च्या बळावर नेते झाले आहेत. ज्याप्रमाणे मी माझ्या बळावर या कलावनिश्वात तग धरुन आहे, त्याचप्रमाणे तुम्ही वर्षानुवर्षांपासून नेते आहात. त्यामुळे ज्या घोषणाबाजीच्या बळावर तुम्ही सत्ता मिळवली आहे आणि आता तुम्ही त्याच घोषणा पूर्णत्वास नेत आहात तर मग ही लोकशाही नाही का?', असा प्रश्न बी- टाऊनच्या या क्वीनने उपस्थित केला.
वाचा : कंगनाने पुन्हा घेतला 'पंगा', यावेळी निमित्त होतं...
कंगनाने अतिशय थेट शब्दांमध्ये तिचं मत मांडत या मुद्द्यावर तिचा मुद्दा सर्वांपुढे ठेवला. मुळात याविषयी बोलण्यासारखं खूप आहे, असं म्हणत तिने आपलं बोलणं आवरतं घेतलं.