मुंबई : कलाजगताच्या झगमगाटाचा अनेकांनाच हेवा वाटतो. मुळात चित्रपटांचं हे जग कोणा एका स्वप्नाहून वेगळं नाही. ज्यामुळे इथं घडणारी प्रत्येक गोष्टही तितकीच रंजक वाटू लागते. मग ते कलाकाराचं आयुष्य असो किंवा त्यानं/ तिनं घेतलेले निर्णय.
झगमगणाऱ्या या दुनियेत काही प्रेमाची वळणंही आहेत. बऱ्याच सेलिब्रिटींनी या वळणांवरून जात त्यांच्या जगण्याच्या नव्या वाटा निवडल्या आहेत.
अभिनेत्री रेखा आणि अभिनेता विनोद मेहरा हे दोघंही यापैकीच एक. असं म्हणतात की रेखा आणि मेहरा एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. त्यांनी लग्नही केलं होतं. (Rekha Vinod mehra )
हिंदी चित्रपट जगतातील याच नात्याबाबत मोठा खुलासा मेहरा यांच्या तिसऱ्या पत्नी, किरण मेहरा यांनी केला आहे.
मुलाखतीत किरण यांना एक प्रश्न केला गेला. रेखा आणि विनोद मेहरा यांच्या नात्याचा तुमच्यावर काय परिणाम होतो का?
प्रश्नाचं उत्तर अगदी सहजपणे देत त्या म्हणाल्या, विनोद मेहरा यांना अखेरच्या क्षणापर्यंत कोणी साथ दिली असेल तर त्या होत्या रेखा. त्या या नात्यात प्रामाणिक होत्या.
रेखा यांच्या याच गुणामुळं त्या आजही मेहरा कुटुंबाच्या सदस्या आहेत. किरण मेहरा यांचं हे बोलणं अनेकांच्या भुवया उंचावून गेलं.
खरंच रेखा- विनोद मेहरा यांचं लग्न झालेलं?
असं कायमच म्हटलं गेलं आहे की, रेखा आणि विनोद मेहरा यांनी एकमेकांवर अमर्याद प्रेम केलं. याच प्रेमाचं शिखर म्हणजे त्यांनी लग्नगाठही बांधली होती.
रेखा यांना घेऊन मेहरा जेव्हा त्यांच्या आईकडे गेले तेव्हा मात्र त्यांनी या सुनेचा स्वीकार केला नाही. इतक्यावरच न थांबता त्यांनी रेखा यांना घराबाहेर काढलं.
रेखा आणि विनोद मेहरा यांच्या नात्याबाबत अनेकही किस्से सांगितले जातात. पण, त्यामागचं सत्य हे खुद्द रेखा आणि मेहराच जाणतात.