मुंबई : देशात लोकसभा निवडणुकांचं सत्र सुरु असतानाच गडचिरोली भागात नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला घडवून आणला. गडचिरोलीतील कुरखेडा भागात घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात १५ जवान शहीद झाले. ज्यामध्ये जवानांना घेऊन जाणाऱ्या गाडीच्या चालकाचाही मृत्यू झाला. महाराष्ट्र दिनाच्याच दिवशी झालेला हा भ्याड आघात पाहता सर्वच स्तरांतून त्याविषयी तीव्र संताप व्यक्त केला गेला.
Deeply Saddened to hear news of the martyrdom of our 15 security personnel in an IED attack by Maoists in Gadchiroli, Maharashtra. My thoughts & prayers are with the families of the martyrs #GadchiroliNaxalAttack
— Riteish Deshmukh (@Riteishd) May 1, 2019
गडचिरोली भागात सुरू असणाऱ्या नक्षलवादी हल्ल्यांचं हे सत्र पाहता फक्त राजकीय वर्तुळ किंवा सर्वसामान्य वर्गातूनच नव्हे, तर कालविश्वातूनही हळहळ व्यक्त केली आहे. हे भ्याड हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत, असं म्हणत सेलिब्रिटींनी चीड व्यक्त केली. स्वरा भास्कर, जावेद अख्तर, रितेश देशमुख आणि अनेकांनीच सोशल मीडियाच्या माध्यमातून या घटनेविषयी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. हे एक अमानवी कृत्य असल्याचं म्हणत लोकशाहीला कमकुवत करणारीच ही घटना असल्याचं अभिनेत्री स्वरा भास्कर हिने ट्विट करत म्हटलं. तर या हल्ल्याने अक्षरश: आपल्याला हादरवून सोडल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात नुकताच प्रवेश केलेल्या अभिनेता सनी देओल यांनी व्यक्त केला.
My tributes to the martyrs & jawans who lost their lives in terrible #NaxalAttack on our security personnel in #Gadchiroli, #Maharashtra. I pray for the families of jawans and wish the injured a speedy recovery
— Sunny Deol (@iamsunnydeol) May 1, 2019
I totally condemn Naxal attack in Gadchiroli, killing 16. Dastardly, inhuman & reflects the utterly degenerate mindset of the so-called ‘revolutionaries’. Ultra left & anarchist violence weakens democracy, hurts the poor. The state must crack down on perpetrators & ensure justice
— Swara Bhasker (@ReallySwara) May 1, 2019
What has happened in Gadchiroli is senseless and barbaric . This is nothing but terrorism that shouldn’t be tolerated .
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) May 1, 2019
कुरखेडा येथील हल्ल्यात शहीद झालेल्या प्रत्येक जवानाच्या कुटुंबासोबत आपण उभं असल्याचं म्हणत अभिनेता रितेश देशमुख याने शहिदांच्या कुटुंबीयांना आधार दिला. गडचिरोलीत झालेला हा हल्ला दहशतवादच आहे आणि हे आता मात्र खपवून घेतला जाणार नाही, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी व्यक्त केली. फक्त कलाविश्वापुरताच सीमीत न राहता या राज्य आणि देशाप्रती आपली भूमिका ओळखत ही कलाकार मंडळीही आता दहशतवाद आणि नक्षलवादी कारवायांविरोधात आता कठोर पावलं उचलण्यात यावीत अशी मागणी करत असल्याचं पाहायला मिळत आहे.