लहानग्या तैमूरची पाऊलं वळताहेत या दिशेने, जाणून घ्या

 तैमूर अली खान, बॉलीवूडमधील सर्वात फेवरेट स्टार किड्सपैकी एक आहे. 

Updated: Mar 24, 2022, 07:44 PM IST
लहानग्या तैमूरची पाऊलं वळताहेत या दिशेने, जाणून घ्या

मुंबई : करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांचा मोठा मुलगा तैमूर अली खान, बॉलीवूडमधील सर्वात फेवरेट स्टार किड्सपैकी एक आहे. त्याने आपल्या मनमोहक आणि मस्तीने पापाराझींची मने जिंकली आहेत.  हा छोटा स्टारकिड बॉलिवूडमधील सर्वात फॅशनेबल स्टार किड्सपैकी एक आहे. ज्याने आता कराटे शिकणाऱ्या स्टार किड्सच्या यादीतही प्रवेश केला आहे. या 5 वर्षाच्या छोट्या स्टार किडने आता कराटे शिकायला सुरुवात केली आहे.

करीना कपूर काही दिवसांपूर्वी मालदीवमधून मुंबईत परतली आहे. परत आल्यानंतर ती शूटिंगमध्ये व्यस्त झाली असून तैमूर शाळेत जाऊ लागला आहे. यासोबतच तो कराटेचं शिक्षणही घेत आहे. तैमूरचे कराटे ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तैमूर व्हाइट ड्रेस  आणि कराटे व्हाईट बेल्ट मध्ये दिसला. फोटो पाहता पाच वर्षांचा तैमूर कराटे शिकण्यात खूप इंट्रेस्ट दाखवत असल्याचं स्पष्ट होतं.

तैमूर एन्जॉय करतो स्टारडम आणि लाइमलाइट
जन्मापासूनच तैमूरने सोशल मीडियावर चर्चेत रहायला सुरुवात केली आणि रातोरात सोशल मीडियावर खळबळ माजवली. आजही तो पापाराझींचा आवडता स्टारकिड आहे. तैमूरला त्याच्या सेलिब्रिटी पालकांपेक्षा स्टारडम आणि लाइमलाइट जास्त आवडतं. आता तैमूरची पापाराझींसोबतही खूप चांगली मैत्री झाली आहे. आता तो त्यांना पाहून लाजत नाही आणि गोंधळून जात नाही, तर त्यांना हाय-हॉलोही करतो.