मुंबई : हॉलिवूडनंतर आता बॉलिवूडला देखील कोरोना व्हायरसची झळ पोहोचली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे अनेक कलाकार शूटींग सुरू असलेल्या ठिकाणी अडकले आहे. अभिनेता मनोज बाजपेयी लॉकडाउनमुळे उत्तराखंडमध्ये अडकला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांची ही टेस्ट करण्यात आली आणि त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. तिथे पत्नी व मुलीसोबत ते एका रिसॉर्टमध्ये राहत आहे.
‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांने सुखरुप असल्याचे सांगितले, 'खबरदारीचा उपाय म्हणून मी ही चाचणी करून घेतली आहे. मी आणि माझा परिवार नैनीतालमध्ये सुखरूप आहोत. येथील परिसर अत्यंत सुंदर आहे.' असं त्याने सांगितले आहे.
नैनीतालपासून चार तासांच्या अंतरावर असलेल्या मुक्तेश्वरमधील एका रिसॉर्टमध्ये तो आपल्या कुटुंबासोबत राहत आहे. मनोज बाजपेयीप्रमाणेच अभिनेता दीपक डोब्रियालसुद्धा उत्तराखंडमध्ये अडकला आहे.