मुंबई : बॉलिवूड चित्रपट एकेकाळी खूप मोठे असायचे. हिंदी चित्रपटात गाणी आणि डान्स असलाच पाहिजे नाही तर त्या सिनेमाला काही मज्जा नाही. ३तासांच्या शोचा जमाना होता म्हणूनच प्रेक्षक ३ ते ६ आणि ९ ते १२ या शोसाठी तिकीट घ्यायचे. तेव्हाचा काळ हा ३ तासांच्या चित्रपटाचा काळ होता. यांवर एक गाणंही आलं, 'चलती है क्या 9 से 12? बदलत्या काळाबरोबर चित्रपटांचा रनटाईम वेळही कमी होत चालला आहे. आता पहिल्या सारखा ३ तासांचा चित्रपट नाही बनंत तर आता चित्रपट निर्माते कमीत-कमी वेळेत स्टोरी सांगण्याचा प्रयत्न करतात. आज आपण अशा चित्रपटांवर नजर टाकूया ज्यात निर्मात्यांनी 100 मिनिटांच्या आत स्टोरी सांगितली आहे
1. Omerta, 96 मिनिटं, 2018
ओमेर्ता ही एका पाकिस्तानी दहशतवादी ओमर सईद शेखची कहाणी आहे ज्याने भारतातून परदेशी लोकांना पळवून नेलं होतं. या दहशतवाद्याला अटक करण्यात आली आणि नंतर एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत सोडण्यात आलं. चित्रपटाचं दिग्दर्शन हंसल मेहता यांनी केलं होतं या सिनेमांत राजकुमार राव मुख्य भूमिकेत दिसला होता.
2. Hope aur Hum, 96 मिनिटं, 2018
होप और हम या चित्रपटाची कहाणी घरातील ज्येष्ठ सदस्य नागेश Copying Machineच्या Obsession मुळे त्रस्त असतो.. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुदीप बंधोपाध्याय यांनी केलं होतं या सिनेमांत नसीरुद्दीन शाह आणि सोनली कुलकर्णी मुख्य भूमिकेत होते.
3. Haraamkhor, 90 मिनिटं, 2015
हरमखोर ही एका विद्यार्थ्याची कहाणी आहे. जी आपल्या शिक्षकाच्या प्रेमात पडते. या चित्रपटाचं दिग्दर्शन श्लोक शर्मा यांनी केले असून यात नवाजुद्दीन सिद्दीकी, श्वेता त्रिपाठी, त्रिमला अधिकारी मुख्य भूमिकेत आहेत.
4. I am Kalaam, 88 मिनिटं, 2011
हा सिनेमा देशातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक सिनेमा आहे. ही एक लहान मुलाची कथा आहे. जो माजी राष्ट्रपती कलाम यांच्यापासून इतका प्रेरणादायक आहे की, त्याने आपलं नावं कलाम ठेवलं नाही तर, आपली हेअर स्टाईलदेखील त्यांच्यासारखी बनविली. हा चित्रपट केवळ वास्तविक नाही तर तितकाच भावनिक देखील आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन निला माधब पांडा यांनी केले असून हर्ष मयर, गुलशन ग्रोव्हर यात मुख्य भूमिकेत आहेत
5. Makdee, 90 मिनिटं, 2002
हा चित्रपट त्या काळातल्या प्रत्येक मुलाला आठवेल. जुळ्या बहिणी चुन्नी-मुन्नी आणि चुडैल यांची ही कहाणी आहे. उत्कृष्ट कथा, उत्कृष्ट अभिनय आणि अशी कथा या चित्रपटाचं दिग्दर्शन विशाल भारद्वाज यांनी केले असून यात श्वेता बासु प्रसाद, शबाना नाझमी, मकरंद देशपांडे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
6. Waiting, 98 मिनिटं, 2015
एक विवाहित स्त्री रुग्णालयात वयस्कर प्राध्यापकाला भेटतात जिथे तिचा जोडीदार हॉस्पिटलमध्ये दाखल असतो. आपल्या जोडीदाराच्या बऱ्या होण्याच्या प्रतीक्षेत दोघेही मित्र बनतात. चित्रपटात प्रतीक्षा, प्रेम आणि मैत्रीची कहाणी आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अनु मेनन यांनी केले असून यात कल्की कोचलीन, नसीरुद्दीन शाह, रजत कपूर कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
7. Meri Nimmo, 90 मिनिटं, 2018
या चित्रपटात, हेमू नावचा मुलगा त्याच्यापेक्षा 8 वर्षांनी मोठी निमो हिच्या प्रेमत् पडतो. स्वप्नं, साधेपण आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भावना, असलेला, हा एक लपलेला खजिना आहे. या सिनेमांचे दिग्दर्शन राहुल गणोरे शंक्ल्या यांनी केलं आहे
8. Peepli Live, 95 मिनिटं, 2010
ही कहाणी आहे नाथाची. जो शेतकरी भत्ता मिळावा म्हणून आत्महत्या करण्याचा विचार करतो. या घटनेची माहिती देण्यासाठी तिथे मीडिया पोहोचते. हा चित्रपट Tragedy आणि Satire यांचं मिश्रण आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अनुषा रिझवी आणि महमूद फारूकी यांनी केलं असून यात ओंकार दास माणिकपुरी, रघुबीर यादव मुख्य भूमिकेत आहेत.
9. Nil Battey Sannata, 100 मिनिटं, 2016
मिनिट ही कथा आहे आई-मुलीच्या सुंदर नात्याची. घराची आर्थिक स्थिती नसल्याने आपेक्षाला शिकण्यास आवडत नसते आणि तिची आई चंदा आपल्या मुलीला प्रेरणा देण्याचा प्रयत्न करत असते. अश्विनी अय्यर तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात स्वरा भास्कर, रिया शुक्ला, पंकज त्रिपाठी आणि रत्न पाठक शाह यांच्या मुख्य भूमिका आहेत.
10. Margarita With A Straw, 100 मिनिटं, 2014
Celebral Palsyला झुंज देणारी एक स्त्री. जी कधीच हार मानत नाही. अभ्यासासाठी ती भारतातून न्यूयॉर्कमध्ये पोहोचते. या सगळ्या प्रवासात ती प्रेमात पडते. या चित्रपटाचं दिग्दर्शन शोनाली बोस, निलेश मनियार यांनी केलं असून या चित्रपटात कल्की कोचलीन, रेवती, सयानी गुप्ता आहेत. .