Amrita Singh Saif Ali khan: 'हम दो हमारे दो'मध्ये ही जोडी खूश होती; मग सैफ-अमृताला कोणाची लागली नजर, का आला नात्यात दुरावा!

Amrita Singh Saif Ali khan Story:  अभिनेत्री अमृता सिंग आणि अभिनेता सैफ अली खान यांनी सगळ्यांच्या विरोधात जाऊन एकमेकांचा हात धरला. कुटुंबाची सुरुवात केली होती आणि या कुटुंबातही सर्वजण खूप आनंदी होते. पण नंतर हे नाते पूर्ण तुटून गेले हे कोणास कळले नाही. 

Updated: Sep 17, 2022, 09:48 AM IST
Amrita Singh Saif Ali khan: 'हम दो हमारे दो'मध्ये ही जोडी खूश होती; मग सैफ-अमृताला कोणाची लागली नजर, का आला नात्यात दुरावा! title=

Amrita Singh Saif Ali khan Marriage: अभिनेत्री अमृता सिंग आणि अभिनेता सैफ अली खान यांनी सगळ्यांच्या विरोधात जाऊन एकमेकांचा हात धरला. आपला सुखाचा संसार सुरु केला. अमृता सिंग आणि  सैफ अली खान हे दोघे कधी काळी एकच असायचे. पण नंतर दोघांमध्ये असे काय घडले की त्यांच्या नात्यात दुरावा आला. त्यांच्यातील अंतर कधी वाढत गेले ते कळलेच नाही आणि मग हे नाते तुटले. सैफ आणि अमृताने 1991 मध्ये लग्न केले. पण 2004 मध्ये दोघे वेगळे झाले. दोघांचे हे प्रेमाचे नाते 14 वर्षेही टिकू शकले नाही. 

'हम दो हमारे दो' मध्ये हे दोघे खूप आनंदी होते

 1991 मध्ये लग्नानंतर, 1995 मध्ये अमृताने एका मुलीला जन्म दिला, ज्याचे नाव दोघांनी सारा अली खान ठेवले. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात वेगळीच रौनक आली. पण 2001 मध्ये मुलगा इब्राहिम अली खान याचा जन्म झाला तेव्हा त्यांचे कुटुंब पूर्ण झाले. म्हणजेच 'हम दो हमारी दो'मध्ये सैफ आणि अमृता आपले आयुष्य आनंदात घालवत होते. पण हा आनंद जास्त काळ टिकू शकला नाही. इब्राहिमच्या जन्मानंतर काही काळातच दोघांच्या नात्यात दुरावा आला. दोघांच्या मतभेदाच्या बातम्या येऊ लागल्या. ज्याची अनेक कारणे आजही सांगितली जातात. अखेर 2004 मध्ये दोघेही वेगळे झाले.

घटस्फोटासाठी अमृताने 5 कोटी रुपयांची केली मागणी 

अमृताने घटस्फोटासाठी अमृताने 5 कोटी रुपयांची मागणी  केली  होती. अमृता सिंग आणि सैफ अली खान यांचा घटस्फोट झाला तेव्हा पोटगी म्हणून 5 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी सैफला ती रक्कम परत देणे खूप कठीण झाले होते. त्यामुळे अडीच कोटी रुपये मिळून दिल्यानंतर उर्वरित अडीच कोटी रुपये त्यांने हप्त्यात दिले. त्यावेळी अमृता आणि सैफचे नाते इतके बिघडले होते की, मुलांचा ताबा मिळाल्यानंतर अमृताने सैफसोबत मुलांना भेटणेही बंद केले होते. याबद्दल बोलताना सैफही एका मुलाखतीत भावूक झाला होता.