Ranbir- Alia Wedding : लग्नासाठी आलियाचे दुसरे वडिलही उपस्थित; वधुरुपात पाहून भावनांचा बांध फुटला

प्रत्येक वडिलांच्या आयुष्यातला हा भावनिक क्षण... 

Updated: Apr 14, 2022, 04:34 PM IST
Ranbir- Alia Wedding :  लग्नासाठी आलियाचे दुसरे वडिलही उपस्थित; वधुरुपात पाहून भावनांचा बांध फुटला  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

Ranbir- Alia Wedding :  ....आणि तो क्षण आलाच. अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांनी त्यांच्या नात्यात एका नव्या प्रवासाची सुरुवात केली. रिलेशनशिपमध्ये आतापर्यंत आव्हानात्मक काळ ओलांडत ही जोडी आज या टप्प्यावर पोहोचली तेव्हा त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवाच होताना काही खास व्यक्तींनी पाहिलं. 

आलिया आणि रणबीर या दोघांच्याही कुटुंबीयांव्यतिरिक्त काही खास मंडळी लग्नसोहळ्यासाठी उपस्थित असल्याची माहिती समोर आली. (Ranbir- Alia Wedding photos)

उपस्थितांमध्ये आलियाच्या दुसऱ्या वडिलांचाही समावेश होता. तिचे हे दुसरे वडील म्हणजे निर्माता- दिग्दर्शक करण जोहर. 

करणच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या आलिया भट्टला त्यानं कायमच आपल्या स्वत:च्या मोठ्या लेकिसारखं वागवलं आहे.  करणची दोन मुलंही आलियाला तितकीच जवळची. 

अनेक कार्यक्रमांमध्येही तिनं करण हा आपल्यासाठी एक खास मित्र असण्यासोबतच आपल्याला वडिलांसमान असल्याचं बोलून दाखवलं आहे. 

आलिया लग्न करतेय म्हटल्यावर करणनं वेळत वेळ काढून या लाडक्या लेकिला धीर देण्यासाठी लग्नमंडप गाठला. यावेळी वधूरुपात जेव्हा ती सर्वांसमोर आली तेव्हा त्याला आपल्या भावना रोखता आल्या नाहीत. (Karan johar at alia bhatt, ranbir kapoors weddings)

डोळ्यादेख आलिया इतकी मोठी कधी झाली, याच भावनेनं त्याच्या डोळ्यांतून अश्रू घरंगळले. तिथं असणाऱ्या अयान मुखर्जी या आलिया आणि रणबीरच्या खास मित्राचा आनंदही त्याच्या अश्रूंवाटे व्यक्त झाला. त्या दोघांनीही आलियाला घट्ट मिठी मारली. (Karan johar ayan mukherjee)

Image

अतिशय भावनिक असाच हा क्षण त्यावेळी तिथं असणाऱ्या प्रत्येकानं अनुभवला. आलियाशी करण आणि अयान या दोघांनीही यावेळी एका खोलीत जाऊन संवाद साधल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Filmfare (@filmfare)

तर, महेश भट्ट यांच्यासोबतही यावेळी अयाननं संवाद साधला. लेकिला सासरी पाठवतानाच्या या अतिशय हळव्या क्षणी सर्वांच्याच डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.