मुंबई : लहान मुलांचा निरागसपणा हा नेहमी विलोभनीय असतो. सैफिनाचा तैमुर सोशल मीडियामध्ये फारच प्रसिद्ध आहे. त्याचा नवा फोटो आला की लगेजच तो व्हायरल होतो पण आता त्याला तोडीस तोड कॅनडाच्या पंतप्रधानांचा मुलगा हैड्री ट्रुडो आला आहे.
सध्या कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो सात दिवसांसाठी सहपरिवार भारत दौर्यावर आले आहेत. विमानतळावर उतरल्यानंतर बुके घेऊन पुढे दुडूदुडू चालणारा हैड्री पहिल्या दिवसापासूनच मीडियाचे लक्ष वेधून घेणारा ठरला आहे.आज जस्टिन त्याच्या परिवारासोबत अमृतसरच्या गोल्डन टेम्पलला भेट देण्यासाठी पोहचले आहेत.
कॅनडाचे पंतप्रधान अमृतसरला पोहचल्यानंतर पुन्हा सार्यांचे लक्ष हैड्रीकडे वळले. एएनआयने त्याचा खास व्हिडिओ शेअर केला आहे. विमानातून उतरताना हैड्रीच्या आईने त्याचा हात पकडण्याचा प्रयत्न केला मात्र येथेही हैड्री एकटाच खाली उतरला.
#WATCH: Canadian Prime Minister #JustinTrudeau arrived in #Punjab's Amritsar, with his family, earlier today. pic.twitter.com/vOXDvO51Pe
— ANI (@ANI) February 21, 2018
एकेकाळी मीडिया सतत तैमुरचे फोटो टिपण्यासाठी धडपड करत होते. मात्र सद्ध्या सात दिवस मात्र सोशल मीडियावर तैमुरपेक्षा हैड्रीचे फोटो अधिक दिसत असल्याने ट्विटरकरांनीही यावर आपल्या खास शैलीत प्रतिक्रिया दिल्या आहेत.
भारत दौर्यासोबतच इतर ठिकाणीही फिरताना हैड्रीचा निरागसपणा मीडियामध्ये लोकप्रिय आहे.
साबरमती आश्रम, ताजमहाल, सुवर्णमंदिर या पाठोपाठ 22 तारखेला जस्टिन जामा मश्दिला भेट देणार आहेत. त्यानंतर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. तरूणाईचा जागतिक स्तरावरील चेहरा म्हणून जस्टिनची ओळख असल्याने 24 तारखेला ते तरूणांच्या एका बैठकीला संबोधित करणार आहे.