Actress Swini Khara Got Engaged : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या 'चिनी कम' (Cheeni Kum) या चित्रपटात लहान मुलीची भूमिका साकारणारी मुलगी तुम्हाला आठवते का? त्या छोट्या मुलीची भूमिका ही स्विनी खारानं (Swini Khara) साकारली होती. आता ती मुलगी छोटी राहिली नाही तर आता ती मोठी झाली असून तिचा साखरपुडा देखील झाला आहे. खरंतर चिनी कम या चित्रपट अमिताभ ज्या घरात राहत होते त्याच्या शेजारी राहणाऱ्या मुलीची भूमिका स्विनीनं साकारली होती. आता स्विनीच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. स्विनीनं हे फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले होते. (Swini Khara Got Engaged)
स्विनीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून साखरपुड्याचे हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये स्विनी ही तिचा होणार नवरा उर्विश देसाईसोबत दिसत आहे. स्विनीनं शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिनं गुलाबी रंगाचा गाऊन परिधान केला होता. तर उर्विशनं काळ्या रंगाचा सूट परिधान केला आहे. एका फोटोत स्विनी उर्विशसोबत डान्स करताना दिसत आहे. साखरपुडा करण्याआधी स्विनी आणि उर्विश हे दोघे बऱ्याच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. स्विनीनं शेअर केलेल्या या फोटोंवर कमेंट करत तिच्या चाहत्यांपासून सेलिब्रिटी तिला आणि उर्विशला शुभेच्छा देत आहेत. (Swini Khara engagement Photos)
हेही वाचा : Holi Songs 2023 : रंगांबरोबरच 'ही' गाणी तुमचं Celebration गाजवतील! पाहा होळी Special Playlist
स्विनी आणि उर्विश हे लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उस्तुकता लागली आहे. अनेकांनी तर कमेंट करत तिला थेट लग्नाची तारिख देखील विचारली आहे. मात्र, त्या दोघांनी लग्नाची तारिख अजून समोर आलेली नाही. स्विनी ही 24 वर्षांची आहे. स्विनीनं एक बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. तिनं अनेक छोट्या-मोठ्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं असं म्हणायला हरकत नाही. स्विनीनं फक्त चित्रपटांमध्येच नाही तर छोट्या पडद्यावर देखील काम केलं आहे. स्विनी सगळ्यात शेवटी सुशांत सिंग राजपूतच्या 'एमएस धोनी' या चित्रपटात दिसली होता. हा चित्रपट 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील तिची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली.