Alok Nath Was Sanskari Only When...: बॉलिवूडमधील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. 90 च्या दशकामध्ये आणि 2000 सालाच्या आसपास अनेक लोकप्रिय तसेच गाजलेल्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या हिमानी यांनी #MeToo मोहिमेसंदर्भात भाष्य करताना माजी सहकाऱ्यावर गंभीर आरोप केलेत. अभिनेते अकोल नाथ यांच्याबद्दल हिमानी यांनी भाष्य करताना आलोक नाथ हे अनेकदा मद्यधुदांवस्थेत असायचे असं त्यांनी सांगितलं आहे. काही पेग प्यायल्यानंतर आलोक नाथ हे पूर्णपणे वेगळीच व्यक्ती म्हणून समोर यायचे, असं म्हणत यासंदर्भातील धक्कादायक अनुभव हिमानी यांनी सांगितला आहे.
हिमानी या नुकत्याच सिद्धार्थ खन्नाच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यांनी यावेळेस 'हम आप के है कौन' चित्रपटाच्या शुटींगदरम्यानचा किस्सा सांगितलं. आलोक नाथ यांनी या चित्रपटाच्या शुटींगदरम्यान मद्यपान करुन गोंधळ घातल्याचं हिमानी यांनी म्हटलं आहे. "मी त्यांच्याबरोबर त्यापूर्वी अनेकदा काम केलं आहे. त्यांच्याबरोबरचा साधा हिशोब असा आहे की त्यांनी मद्यपान केलेलं नसतं तोपर्यंत ते संस्कारी असतात. त्यांचं व्यक्तीमत्व हे दुहेरी असल्यासारखं वाटायचं," असं हिमानी म्हणाल्या.
"नॅशनल स्कूल ऑफ ड्राममधील एका गोंधळाव्यतिरिक्त मला त्यांच्याकडून कधी वैयक्तिक त्रास झाला नाही. मात्र मी अनेकांकडून ऐकलं आहे की काही पेग प्यायल्यानंतर ते पूर्णपणे वेगळे व्यक्ती होतात. मी एकदा याचा अनुभव घेतला आहे. आम्ही एका पुरस्कार सोहळ्याला जात असताना त्यांनी मद्यपान केलं होतं आणि त्यांचं स्वत:वर नियंत्रण नव्हतं. त्यांची पत्नी त्यांना सतत शांत राहण्यासाठी सांगत होती. मी सुद्धा त्यांना स्वत:ला सावरण्यास सांगितलं. तुम्ही स्वत:ला सावरलं नाही तर तुम्हाला खाली उतरवलं जाईल असं त्यांना सांगितलं होतं. यापूर्वीही त्यांना अशाप्रकारे वाईट वर्तवणुकीसाठी खाली उतरवण्यात आलं होतं," असं हिमानी यांनी सांगितलं. "ते सेटवर फार शांत आणि प्रोफेश्नल असायचे. मात्र सेटवर रात्री 8 वाजल्यानंतर त्यांच्यातील वेगळीच व्यक्ती समोर यायची," असं हिमानी म्हणाल्या.
'बाबूजी' म्हणत अनेक हिंदी चित्रपटांमध्ये संस्कारी बापाची भूमिका बजावल्याने आलोक नाथ घरोघरी पोहोचले. अनेक मालिकांमध्येही त्यांनी अशीच भूमिका साकारली आहे. 2018 ते 2019 दरम्यान अनेक अभिनेत्रींनी त्यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. लेखिका आणि निर्मात्या वनिता नंदा यांनी सर्वात आधी सर्वांसमोर येत आलोक नाथ यांच्यावर गंभीर आरोप केले.
नक्की वाचा >> 'गुलजार 'स्त्रीविरोधी', सगळ्या शिव्या...'; हनी सिंगच्या विधानाने खळबळ! नव्या वादाला फुटलं तोंड
जवळपास दोन दशकं आलोक नाथ यांनी आपला लैंगिक छळ केल्याचं या निर्मातीचं म्हणणं होतं. त्यानंतर अभिनेत्री नवनीत निशाण, संध्या मृदूल आणि इतरांनाही आलोक नाथ यांच्यावर गंभीर आरोप केले. हम साथ हाथ है चित्रपटातील काही कलाकारांनीही आलोक नाथ यांच्यावर असेच आरोप केले. आलोक नाथ यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. तेव्हापासून पुरस्कार सोहळे, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आलोक नाथ फारसे दिसून येत नाहीत.