मुंबई : लंडन, ऑकलंड, हॉंगकॉंगनंतर आता सलमान खान 'दबंग टूर' घेऊन अमेरिकेत पोहचला आहे. 22 जूनपासून सलमान खान अमेरिका आणि कॅनडाच्या दौर्यावर आहे. या दोन्ही देशाच्या विविध राज्यामध्ये दबंग टूर अंतर्गत विविध लाईव्ह शोचं आयोजन करण्यात आलं आहे.
सलमान खानच्या या वर्ल्ड टूरमध्ये जॅकलीन फर्नांडीस, कॅटरिना कैफ, सोनाक्षी सिन्हा, डेजी शहा या अभिनेत्री आहेत. सोबतच प्रभूदेवा, पंजाबी गायक गुरू रंधावा, मनीष पॉल सहभागी झाले आहेत.
रेस 3 मध्ये सलमान खान सोबत डेजी शहा आणि जॅकलीन फर्नांडीस झळकल्या होत्या. स्क्रिनवर या सलमन खानसोबत धमाल केल्यानंतर आता लाईव्ह शोमध्येही सलमान खानसोबत थिरकत आहेत. जॅकलीन सोशल मीडीयावर बॅक स्टेज धमा मस्ती सोबतच तिच्या रिहर्सलचेही काही फोटो, व्हिडिओ शेअर करत आहे.
जॅकलीनने नुकताच सलमान खानचा भाचा अहिलसोबत डिस्नी लॅन्डमध्ये मज्जा केल्याचे काही फोटोंमध्ये दिसत आहे.
रेस 3 च्या बॉक्सऑफिसवरील सुपरहीट कामगिरीनंतर आता सलमान खान 'भारत' या बहुप्रतिक्षित सिनेमाच्या शूटिंगला सुरूवात करणार आहे. या चित्रपटात सलमानसोबत प्रियंका चोप्रा, दिशा पटणी झळकणार आहेत.