लालू प्रसाद यांचा मुलगा रुपेरी पडद्यावर, पोस्टर लॉन्च

लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेज बॉलिवूडमध्ये एंट्री करत आहेत. त्यांच्या आगामी सिनेमाचे पोस्टर लॉन्च करण्यात आलेय. 

Updated: Jul 1, 2018, 06:23 PM IST
लालू प्रसाद यांचा मुलगा रुपेरी पडद्यावर, पोस्टर लॉन्च title=
Pic courtesy: Twitter/@TejYadav14

पाटणा : बिहारमधील वादग्रस्त व्यक्तिमत्व आणि चारा घोटाळ्याप्रकरणी तरुंगात असलेले राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेज बॉलिवूडमध्ये एंट्री करत आहेत. त्यांच्या आगामी सिनेमाचे पोस्टर लॉन्च करण्यात आलेय. शरीरयष्टी अधिक उठून दिसावी म्हणून त्यासाठी ते रोज जिममध्ये जाऊन घाम गाळत असल्याचेही समोर येत आहे. तसेच त्यानी आपल्या ट्विटर हँडलवरून त्याच्या आगामी चित्रपटाचं पोस्टरही पोस्ट केलेय. 

लालूप्रसाद यादव आणि राबडी देवी यांचा मुलगा तेज प्रताप यादव यांचा विवाह अलिकडेच झाला. चंद्रिका राय हे बिहारचे माजी मुख्यमंत्री दरोगा राय यांचे सुपूत्र आहेत. चंद्रिका राय यांची मुलगी ऐश्वर्या हिच्यासोबत तेज प्रताप यांचा विवाह झाला.  

बिहारचे माजी आरोग्यमंत्री तेजप्रताप यादव यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून त्याच्या आगामी 'रुद्रा – द अवतार' या चित्रपटाचं पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये तेजप्रताप यांचा गॉगल घातलेला फोटोही झळकताना दिसत आहे. या चित्रपटासाठी आपली शरीरयष्टी बनवण्यात तेजप्रताप व्यग्र आहेत.

दरम्यान, राजकारणापेक्षा चित्रपटांमध्ये अधिक स्वारस्य असलेल्या तेजप्रताप यांनी यापूर्वीही एका भोजपुरी चित्रपटात काम केलं आहे. पण, दुर्दैवाने तो चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही.