Where is Anupam Kher's First Wife: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे अनुपम खेर यांची. अनुपम खेर हे सध्या चर्चेत आहेत. मागील वर्षी त्यांची बरीच चर्चा रंगलेली होती. त्यांचा 'द काश्मिर फाईल्स' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली होती. अशाच आता त्यांचा विवेक अग्निहोत्रींसोबतचा 'द वॅक्सिन वॉर' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सध्या त्यांच्या या चित्रपटाची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. यावेळी या चित्रपटातून नाना पाटकेरही दिसणार आहेत. आपल्या प्रोफेशनल आयुष्यासोबतच अनुमप खेर हे आपल्या वैयक्तिक आयुष्यासाठीही चांगलेच ओळखले जातात. किरण खेर या त्यांच्या पत्नी आहेत. सोबतच त्याही एक अभिनेत्री आहेत. त्यामुळे सोशल मीडियावरही त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. परंतु तुम्हाला माहितीये का की अनुमप खेर यांचे हे दुसरे लग्न आहे.
अनुपम खेर यांचे पहिले लग्न झाले होते. परंतु त्यांचे लग्न हे एकही दिवस टिकले नाही. त्यातून त्यांच्या पहिल्या बायकोनं अनुपम खेर यांच्यासोबत विभक्त झाल्यानंतर आपल्या दुसऱ्या पतीपासूनही घटस्फोट घातला होता असंही कळतं आहे. जेव्हा अनुपम हे आपल्या पहिल्या पत्नीपासून विभक्त झाले त्यानंतर त्यांनी 6 वर्षांनंतर आपली दुसरी पत्नी किरण यांच्याशी लग्न केले. किरण खेर यांचेही हे दुसरे लग्न होते. त्यांनाही आपल्या पहिल्या पतीपासून मुलगा आहे ज्याचे नावं सिंकदर खेर आहे. गौतम बेरी आणि किरण खेर यांचा सिकंदर खेर हा मुलगा आहे. तोही अभिनेता आहे. ट
हेही वाचा : 'सूर नवा ध्यास नवा' मधील मॉनिटरला ओळखणं झालं कठीण; स्पृहानं शेअर केला फोटो
रिपोर्ट्सनुसरा, अनुपम खेर यांचे लव्ह मॅरेज होते. त्यांनी मधुमालती कपूर यांच्याशी लग्न केले होते. त्याही अभिनेत्री आहेत. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामातून त्यांनी एकत्र शिक्षण घेतले होते. तेव्हाच त्यांचे प्रेम बसले आणि त्यांनी लग्न केले. मग त्यांनी लग्न केले. परंतु हे लग्न एक वर्षेही टिकले नाही. 1979 साली ते दोघं वेगळे झाले. मधुमालती यांनी मग रणजीत कपूर यांच्याशी लग्न केले. परंतु त्यांचाही घटस्फोट झाला.
'ब्रह्मास्त्रः द शिवा', 'एक लड़की को देखा तो ऐसा लगा', दे दे प्यार दे, सोनू के टीटू की स्वीटी, 'गदर एक प्रेम कथा' अशा अनेक चित्रपटांतूनही मधुमालती यांनी कामं केली आहेत.
आज अनुपम खेर आणि किरण यांच्या लग्नाला 38 वर्षे झाली आहेत. किरण खेर यांचे पहिले पती गौतम बेरी हे होते. त्यांचे लग्न हे 6 वर्षे टिकले. 1981 साली त्यांच्या सिकंदर खेर या मुलाचा जन्म झाला होता. त्यांनतर म्हणजे सिकंदरच्या जन्मानंतर ते दोघं 1985 मध्ये वेगळे झाले. त्यानंतर किरण यांनी अनुपम खेर यांच्याशी लग्न केले.