मुंबई : संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दिवसागणिक कोरोना व्हायरसच्या रूग्णांच्या संख्येत भर पडत आहे. कोरोना व्हायरसमुळे अनेक चित्रपटगृह आणि शाळा देखील बंद करण्यात आल्या आहेत. शिवाय अनेक कार्यक्रम देखील रद्द करण्यात आले आहेत. आता २७ मार्च पासून सुरू होणाऱ्या १००व्या नाट्य संमेलनावर तात्पुरता पडदा टाकण्यात आला आहे. नाट्य संमेलन पुढे ढकलत असल्याची घोषणा नाट्य परिषदेच्या वतीने करण्यात आली.
'कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचे १००वे महाराष्ट्रव्यापी नाट्यसंमेलन पुढे ढकलण्यात आले आहे.' अशा आशयाचं ट्विट अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेने ट्विटरच्या माध्यमातून केले आहे.
करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचे १०० वे महाराष्ट्रव्यापी नाट्यसंमेलन पुढे ढकलण्यात आले आहे....#नाट्यसंमेलन१०० #natyasammelan100 @ashoknarkar4 @ratnakantjagtap @soumitrapote @KalpeshrajMT pic.twitter.com/12uirjDY5r
— अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (@NatyaParishad) March 13, 2020
आता मुंबई आणि पुणे या महत्त्वाच्या शहरांमध्ये देखील कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेत संमेलन पुढे ढकलण्याचा पर्याय सांगलीचे निवास उपजिल्हाधिकारी यांनी दिला आहे.
आता नाट्य संमेलन नक्की कोणत्या तारखेला होणार हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही. भारतात कोरोना व्हायरसच्या रूग्णांची संख्या ७३ वर गेली आहे.