याच चित्रपटामुळं महेश कोठारे झाले होते कंगाल, घरही झालं जप्त; मग 5 वर्षांत जे केल...

Mahesh Kothare : महेश कोठारे यांच्या आयुष्यावर आधारीत 'डॅमइट आणि बरंच काही' हे पुस्तक प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. त्या पुस्तकात त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Sep 29, 2023, 03:18 PM IST
याच चित्रपटामुळं महेश कोठारे झाले होते कंगाल, घरही झालं जप्त; मग 5 वर्षांत जे केल... title=
(Photo Credit : Social Media)

Mahesh Kothare : मराठी चित्रपटसृष्टीतल लोकप्रिय दिग्गज अभिनेता महेश कोठारे यांचे आजही लाखो चाहते आहेत. महेश कोठारे हे त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून चर्चेत असतात. त्यांच्या पोस्ट आणि त्यांचे लेख सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. महेश यांनी त्यांच्या 'डॅमइट आणि बरंच काही' या पुस्तकातून त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला. त्यांच्या या आयुष्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. 

महेश कोठारे यांनी स्वत: 'डॅमइट आणि बरंच काही' हे पुस्तक स्वत: लिहिलं. या पुस्तकात त्यांनी त्यांच्या जीवनातील अनेक गोष्टी म्हणजेच खासगी आयुष्यापासून त्यांच्या करिअरपर्यंत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. महेश कोठारे यांच्या या पुस्तकाविषयी सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे. यात त्यांचा करिअरमधील संघर्षानं अनेकांचे लक्ष वेधले आहे. खरंतर महेश कोठारे यांचा एक काळ असा होता, जेव्हा त्यांना त्यांचं राहत घर देखील विकावं लागलं होतं. घर विकण्याविषयी आदिनाथ कोठारे यानेही एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. 2005 मध्ये जेव्हा ते खबरदार हा चित्रपट करत होते. तेव्हा ते कर्जबाजारी झाले होते. त्याविषयी सविस्तर सांगत आदिनाथ कोठारे म्हणाला की 'त्यांनी एक चित्रपट केला पण तो चालला नाही. त्यांच्यावर असलेलं कर्ज हे फेडता येत नव्हतं. त्यावेळी कोल्हापूरमध्ये शूटिंग करत असताना बँकेनं आमच्या मुंबईच्या घरावत जप्ती आणली होती. तेव्हा मी एमबीए करत होतो. पण, मला त्यांनी कधीच याविषयी माहिती मिळू दिली नाही. अशा परिस्थितीतही वडिलांनी चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं. त्यानंतर काय तर आई-वडिलांनी मला आणि माझ्या आजी-आजोबांना पुण्याच्या घरात ठेवलं आणि ते दोघं मुंबईत भाड्याच्या घरात राहु लागले.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : लॉटरी लागली; KBC मधील स्पर्धकासोबत बिग बी जाणार डिनर डेटवर!, कोण आहे ती नशिबवान?

पुढे आदिनाथ म्हणाला की '2005 हे वर्ष आमच्यासाठी खूप खाली गेलेला काळ होता. चित्रपट करत असताना वडिलांनी सगळं गमावलं होतं. पण मग त्याचं चित्रपटानं त्यांना सगळं काही मिळवून दिलं. 2011 मध्ये त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील सगळ्यात मोठी डील केली आणि मग काय आमचं सगळं कर्ज फेडलं. इतकंचं नाही तर आमचं स्वत: चं घर सुद्धा झालं.' महेश कोठारे यांचे 'धुमधडाका','झपाटलेला', 'धडाकेबाज', 'थरथराट' हे गाजलेले चित्रपट आहेत.