Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : छोट्या पडद्यावरील (Television) सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक काळ चालणारी मालिका म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah). या प्रसिद्ध मालिकेतील पात्र घराघरात पोहोचली आहेत. तब्बल चौदा वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. पण गेल्या काही काळात या मालिकेतील कलाकार एकामागोमाग एक मालिकेतून बाहेर पडत आहेत. दिशा वकानी (Disha Vakani), शैलेश लोढा (Shailesh Lodha), गुरुचरण सोढी अशा अनेक कलाकारांनी या मालिकेला अलिवदा केला आहे. आता मालिकेचे दिग्दर्शकच या मालिकेतून बाहेर पडले आहेत.
14 वर्षांनी सोडली मालिका
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेचे दिग्दर्शक (Director) मालव राजदा (Malav Rajda) यांनी तब्बल 14 वर्षांनी या मालिकेची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मालव राजदा यांच्या या निर्णयाबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मालव राजदा यांनी 15 डिसेंबरला तारक मेहता मालिकेचं शेवटचं शुटिंग केलं होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मालव राजदा आणि प्रोडक्शन हाऊसदरम्यान काही वाद सुरु होता. या कारणाने मालव राजदा यांनी तडकाफडकी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला.
मालव राजद यांनी मात्र अद्याप याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांनी मालिकेचे निर्माचे असित मोदी (Asit Kumarr Modi) यांचे आभार मानले आहेत. 14 वर्षांच्या सलग शुटिंगनंतर आपल्या कामात तोच तोच पणा येतो, त्यामुळे आपल्या क्रिएटिव्हीटीला वाव देण्यासाठी वेगळी आव्हान स्विकारण्याची गरज असते त्यामुळे आपण यातून बाहेर पडत असल्याचं मालव राजदा यांनी सांगितलं. तारक मेहता मालिकेबरोबर आपल्या 14 वर्षांच्या प्रवासाबद्दल सांगताना मालव राजदा यांनी आनंद व्यक्त केला आहे. हा प्रवास आयुष्यातील सुखद होता, या मालिकेमुळए मला केवळ प्रसिद्धी आणि पैसाच नाही तर माझी जीवनसाथी देखील मिळाली, असं मालव राजदा यांनी म्हटलं आहे.
मालिकेच्या टीआरपीवर फरक पडणार?
तारक मेहता या प्रसिद्ध मालिकेतून गेल्या काही दिवसात अनेक कलाकार बाहेर पडले आहेत. मालव राजदा यांच्या आधी टप्पूची भूमिका साकारणारा राज अनाडकट (Raj Anadkat), तारक मेहताची भूमिका साकारणारे अभिनेते शैलेश लोढा यांनी मालिकेला अलविदा केला आहे. मालिकेतील प्रमुख पात्र असणारी दया बेन अर्थात दिशा वकानी अनेक वर्षांपासून मालिकेतून बाहेर आहेत. तिच्या जागी अद्याप नवी दयाबेन आणण्यात मालिकेला अपयश आलं आहे. त्यातच आता दिग्दर्शकानेच मालिका सोडल्याने मालिकेच्या लोकप्रियतेवर काय परिणाम होतो हे बघण्यासारखं असेल.