'आश्रम 3'आधीही बोल्डनेसच्या बाबतीत Esha Guptaनं ओलांडल्या मर्यादा

व्हायरल होताहेत त्या बोल्ड सीनचे काही फोटो 

Updated: May 28, 2022, 08:36 AM IST
'आश्रम 3'आधीही बोल्डनेसच्या बाबतीत Esha Guptaनं ओलांडल्या मर्यादा title=
ashram 3

मुंबई : बोल्डनेससाठी ओळखली जाणारी अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta) बॉलिवूडमध्ये गेल्या काही काळापासून सक्रिय आहे. ईशानं आतापर्यंत साकारलेलं प्रत्येक पात्र आणि त्यातूनही दिसलेला तिचं मादक रुप कायमच चर्चेचा विषय ठरलं. सध्या ईशा चर्चेत आहे ती म्हणजे 'आश्रम 3' (Aashram 3) या सीरिजमुळे. 

म्हणे ईशानं यामध्ये एकाहून एक बोल्ड सीन दिले आहेत. पण, तुम्हाला माहितीये का यापूर्वीही ईशानं बोल्डनेसच्या बाबतीत बऱ्याच मर्यादा ओलांडल्या आहेत. जिथं तिनं इंटिमेट सीन साकारले आहेत. 

आगामी सीरिजच्या ट्रेलरमध्येच ईशाचे इतके बोल्जड सीन आहेत की, सीरिज पाहायलाच हवी असंच काहींचं म्हणणं. 

या सीरिजआधीसुद्धा ईशाचं हे रुप दिसलंय. अभिनेता इमरान हाश्मी याच्यासोबत ईशा 'जन्नत 2' या चित्रपटामध्ये झळकली होती. या चित्रपटात तिचे आणि इमरानचे असंख्य पॅशनेट किसिंग सीन होते. 

'राज 3डी'मध्येई ईशानं इमरान हाश्मी याच्यासोबतच इंटिमेट सीन दिला होता. तिच्या या सीनमुळंच चित्रपट चर्चेत आला होता. 

'चक्रव्यूह'च्या निमित्तानं ईशानं अभिनेता अर्जुन रामपाल याच्यासोबतचा इंटिमेट सीन दिला होता. या सीनसाठी तिनं सर्वच मर्यादा ओलांडल्याचं पाहायला मिळालं होतं.