मुंबई : मुंबई क्रूज ड्रग्स केस प्रकरणात अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला एनसीबी (Narcotics Control Bureau) कडून क्लिनचीट देण्यात आली आहे. या निमित्तानं पुन्हा एकदा समीर वानखेडे यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.
हे तेच समीर वानखेडे आहेत ज्यांनी त्यावेळी हे प्रकरण हाताळत सर्व तपास सत्र चालविली होती. सदर प्रकरणी आर्यनसह पाच इतर व्यक्तींनाची क्लिनचीट देण्यात आली आहे. त्यांची नावं मात्र चार्जशीचटमध्ये नाहीत.
ड्रग्स प्रकरणात आर्यनला मिळालेला न्याय पाहून कलाजगतातून सर्वांनीच आनंद व्यक्त केला आहे. यामध्ये अभिनेत्री पूजा भट्ट हिनंही एक ट्विट करत कायमच सत्याचाच विजय होतो, असंही म्हटलं.
काय म्हणाली पूजा ?
तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर टीका करत पूजानं लिहिलं, 'कोण समीर? माफी मागितली? अहं; ते बहुधा चूक सुधारण्यात आणि लोकांसमोर लाजरे आणि योग्य असे अधिकारी होण्यासाठी व्यग्र असावेत'.
त्यांच्याकडे किती सारी कामं आहेत, एकतर ते असे एकचटेच आहेत ज्यांनी समाजातील घाण स्वच्छ करण्याचं ठरवलं आहे. जगातून भ्रष्टाचार आणि वाईट प्रवृत्ती नष्ट करण्याचा त्यांनी ठेकाच घेतला आहे, असे सणसणीत टोले पूजानं ट्विट करत वानखेडे यांना लगावले.
Sameer who? Er sorry,where? Ah! Probably very busy being a righteous,publicity shy officer elsewhere? So much of a mess to clean up after all. And who better than the least corrupt of them all to cure society of all evil & rot. Except this time,no selfies allowed. #truthprevails
— Pooja Bhatt (@PoojaB1972) May 27, 2022
Tough times don’t last. Tough people do.
Time heals all wounds. Time also wounds all heels.— Pooja Bhatt (@PoojaB1972) May 27, 2022
नेहमी सत्याचाच विजय होतो, असं सांगताना कठीण काळही नेहमीच योग्य असतो असं नाही, वेळच या सर्व जखमा बऱ्या करते असं सूचक वक्तव्य तिनं ट्विटच्या माध्यमातून केलं.
दरम्यान, समीर वानखेडे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश सरकारने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आर्यन खान प्रकरणी समीर वानखेडेंनी जो तपास केला. त्या तपासात अनेक त्रुटी असल्याचा आरोप होतोय. त्यामुळे NCBच्या दक्षता पथकाकडून चौकशी करण्यात आलीय. याच समितीचा अहवाल NCBकडून सादर केला जाणार आहे.