प्रसिद्ध क्रिकेटरकडून लग्नाआधीच आई बनली 'ही' अभिनेत्री

निनाचं आयुष्य वाचण सोपं आहे पण ते समजून घेणं खूप कठीणं आहे.

Updated: Jun 24, 2018, 11:58 AM IST
प्रसिद्ध क्रिकेटरकडून लग्नाआधीच आई बनली 'ही' अभिनेत्री title=

मुंबई : 'वो शादीसे पेहले मॉं बन गयी !', 'मै तुम्हारे बच्चे की मॉं बनने वाली हू' असे डायलॉग आपण सिनेमातून फार ऐकले असतील. पण अस कोण्या सेलिब्रेटीसोबत प्रत्यक्षात घडलयं याबद्दल तुम्हाला माहिती आहे का ? विचार करा अशा सेलिब्रेटीला समाजातून काय काय ऐकून घ्यावं लागत असेल. आपण बोलतोय प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ताबद्दल. तिची मुलगी मिसाबा गुप्ता फॅशनच्या दुनियेत मोठ नाव कमावतं आहे. निनाचं आयुष्य वाचण सोपं आहे पण ते समजून घेणं खूप कठीणं आहे.

नावाचा उल्लेख टाळला 

वेस्ट इंडिज क्रिकेट टीमचे स्टार क्रिकेटर विवियन रिचर्ड्स आणि नीना यांच्यात जवळंच नातं हो. दोघांना अनेक सोहळ्यात एकत्र पाहिलं गेलं. आम्ही लग्नाबद्दल विचार करू असं कोणत नात आमच्यात राहिलं नसल्याचे निनाने एका मुलाखतीत सांगितले होते. दोघांमध्ये समज होती. दोघांच नातं फार काळ टीकल नाही पण निना गुप्ता लग्नाशिवाय आई बनली अशा बातम्या त्यावेळी येत असत. पण निनाने कधीच कोणासमोरही आपली मुलगी मिसाबाच्या वडिलांच्या नावाचा खुलासा केला नाही. 

'लग्नाआधी आई बनण हा माझा निर्णय होता पण याचा विवियनच्या करिअरवर कोणता परिणाम मला होऊ द्यायचा नव्हता' असही तिने एकदा सांगितल होतं. विवियन त्यावेळी स्टार क्रिकेटर होते. त्यांचा पत्नीसोबत खूप आधी घटस्फोट झाला होता.  त्यांना दोन मुल होती. १९८९ मध्ये नीनाने एका गोड मुलीला जन्म दिला.

निनाला धमकी 

प्रीतिश नंदी यांना मिसाबाचा जन्म दाखल्याची फोटो कॉपी मिळाल्यानंतर वडिलांच नाव समजलं. सर्वांसमोर याचा खुलासा कर नाहीतर दैनिकात यासंदर्भात छापून आणेन अशी धमकी त्यांनी निनाला दिली. प्रीतिशने तो जन्म दाखला विकली ऑफ इंडियामध्ये छापून आणला. पण याचा निनालाच जास्त फायदा झाला. निना आणि मसाबा सगळीकडे प्रसिद्ध झाल्या. बोल्ड निर्णय मानत अनेकांनी निनाची पाठराखण केली.

काय करते मसाबा ?

मसाबा फॅशन डिझायनर आहे. तिच्यानावे दिल्ली, मुंबई, कोलकाता सारख्या अनेक जागी कित्येक स्टाईलिश फॅशन वार्डरॉब आऊटलेट आहेत. निना आता अमेरिकेत राहते. २००८ मध्ये तिने बिझनेसमॅन विवेक मेहराशी लग्न केलं.