'लग्नात नाचायचे किती पैसे घेणार?', प्रश्न विचारताच अभिनेत्री हैराण

 युजरच्या प्रश्नावर संतापली प्रसिद्ध अभिनेत्री   

Updated: Dec 22, 2021, 12:35 PM IST
'लग्नात नाचायचे किती पैसे घेणार?', प्रश्न विचारताच अभिनेत्री हैराण  title=

मुंबई : झगमगती दुनिया बाहेरून दिसायला कितीही सुंदर असली तरी, या दुनियेत वावरणाऱ्या सेलिब्रिटींना अनेक वाईट गोष्टींचा सामना करावा लागतो. पाकिस्तानी अभिनेत्री आणि यूट्यूबर आयशा उमर तिच्या एका डान्स व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी आयशाने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये भन्नाट डान्स केला. आयशाचा डान्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आयशाने मैत्रिणीच्या लग्नात बॉलिवूडच्या एका गाण्यावर डान्स केला. 

तिचा डान्स पाहून सोशल मीडियावर तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. पण ट्रोल करणाऱ्यांना तिने सडेतोड उत्तर दिलं आहे. एका युजरने आयशाला ट्रोल करत विचारले, 'आमच्या लग्नात नाचायचे किती पैसे घेणार?' यावर आयशा भडकली आणि संतापात त्या युजरला सडेतोज उत्तर दिलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Galaxy Lollywood (@galaxylollywood)

आयशा म्हणाली, 'मी कोणाच्याही लग्नात नाचत नाही. मी फक्त माझ्या कुटुंब आणि मित्रांच्याचं लग्नाच मनसोक्त नाचते. तुम्ही देखील तुमच्या मित्रांच्या लग्नात नाचता. त्याठिकाणी तुम्ही-मी पैसे घेत नाही. तुमच्या प्रमाणे आम्ही देखील व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत मित्रांच्या लग्नात नाचण्यासाठी सराव करतो...'

पुढे ती म्हणाली, 'हे सोपं नाही. तरी आम्ही सर्व सांभाळून स्वतःसाठी आणि मित्रांसाठी वेळ काढतो. या गोष्टी स्वतःसाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात. मी फक्त माझ्या जवळच्या व्यक्तींच्या लग्नाच नाचते आणि त्यासाठी मी पैसे घेत नाही...'

व्हिडीओमध्ये आयशा 'ये जवानी है दिवानी' सिनेमातील 'बलम पिचकारी' गाण्यावर दोन मित्रांसोबत ठेका धरताना दिसत आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. काहींना तिचा हा व्हिडीओ आवडला तर काहींनी मात्र आयशाला ट्रोल केलं.