अभिनेत्री रुपाली भोसलेचा बदललेला लूक पाहून चाहत्यांना बसतोय धक्का

स्टार प्रवाहावरील 'आई कुठे काय करते' मालिका प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलीय. 

Updated: Sep 18, 2022, 07:14 PM IST
अभिनेत्री रुपाली भोसलेचा बदललेला लूक पाहून चाहत्यांना बसतोय धक्का title=

मुंबई : स्टार प्रवाहावरील 'आई कुठे काय करते' मालिका प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलीय. असं असताना प्रेक्षक कलाकारांना त्यांच्या खासगी आयुष्यातही फॉलो करत असतात. मालिकेतील संजना म्हणजे अभिनेत्री रुपाली भोसलेबाबत एक अजबच माहिती समोर आली आहे. रुपालीची कोणतीही पोस्ट असो ती व्हायरल होतेच. 

असाच एक व्हिडिओ अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रुपालीने मेकओव्हर केल्याचा दिसत आहे. तिचा हा मेकओव्हर चाहत्यांना मात्र प्रचंड आवडलाय. 

ही पोस्ट शेअर करत रुपालीनं या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, या लूकमुळे तिला लहानपणीचे दिवस आठवलेत. रुपालीनं याचं श्रेय तिच्या हेअर ड्रेसर्सना दिलं आहे. ती म्हणाली, अगोदर एवढे केस कापायला त्या तयार नव्हत्या. पण मन घट्ट करून त्यांनी हे केलं. पुढे ती असंही म्हणाली की, माझा लूक बदलायची वेळ येते, तेव्हा माझ्या हेअर ड्रेसर्स महत्त्वाची भूमिका निभावतात.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अवघ्या काहीच वेळात रुपालीच्या या पोस्टने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. इतक्या शॉर्ट हेअर लूकमध्ये रुपाली मालिकेतही तशीच दिसणार का? याचबरोबर संजनाचा या मालिकेत काही मेकओव्हर दाखवणार आहेत का? हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. अनेकांना रुपालीचा हा लूक आवडलाय. तर अनेकांना मात्र रुपालीचा हा लूक खटकला आहे. अनेकांनी अभिनेत्रीला जोरदार ट्रोल केलंय.