मुंबई : दक्षिण सिनेमांतील सुपरस्टार रजनीकांत यांचा काला हा सिनेमा आज ७ जून रोजी प्रदर्शित झाला. थलायवाचा सिनेमा म्हटलं की चाहत्यांसाठी एक पर्वणीच असते. 'काला' हा सिनेमा अनेक गोष्टींसाठी खास मानला जातो. बाकीचे सिनेमांच्या पहिला शो सकाळी ८ ला असतो तिथे कालाचा पहिला शो सकाळी ४ वाजता होता.
रजनीकांतच्या चाहत्यांना किती वेड आहे याचा अंदाज तुम्ही ४ चा हाऊसफुल शो आहे यावरून लावू शकता. पहिल्याच दिवशी हा सिनेमा पाहता यावा म्हणून प्रेक्षक रांगेत उभं राहून याचं तिकिट काढणं पसंद करतात.
एवढंच काय तर रजनीकांतला मोठ्या पडद्यावर पाहताना तामिळनाडू आणि महाराष्ट्रात चाहत्यांनी एकच गर्दी केली. थिएटर बाहेर डान्स करून प्रेक्षकांनी या सिनेमांच स्वागत केलं. मीडिया रिपोर्टनुसार सकाळी ४ वाजता चाहत्यांनी सिनेमागृहात डान्स केले आहेत.
रजनीकांतला देव समजणाऱ्या चाहत्यांनी सिनेमागृहाच्या बाहेर असलेल्या पोस्टरला दूधाने आंघोळ घातली. तसेच रस्त्यावर फटाके फोडून आतिशबाजी केली. चैन्नईत अनेक रस्त्यांवर सजावट करून आजचा दिवस हा उत्सवाप्रमाणे साजरा केला.
महत्वाची बाब म्हणजे रजनीकांत पुन्हा एकदा सिनेमांत डॉनची भूमिका साकारत आहे. या सिनेमाला रजनीकांतचा जावई धनुषने प्रोड्यूस केलं आहे. या सिनेमाला सेंसर बोर्डाने १४ कट्सनंतर रिलीजला परवानगी दिली आहे.