Feroz Khan son Fardeen Khan : बॉलिवूडमध्ये घराणेशाही आहे आणि त्यामुळे बाहेरच्या लोकांना (आऊटसाईडर्सना) बॉलिवूडमध्ये एन्ट्री मिळत नाही त्यांना फार मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो त्याचसोबत त्यांचे पिक्चर चालू देत नाहीत अशी टीका बॉलिवूडच्या स्टारकीड्सवर आणि त्यांना लॉन्च करणाऱ्या निर्मात्यांवर केली जाते. परंतु तुम्हाला माहितीये का की असे अनेक स्टारकीड्स आहेत ज्यांचेही करिअर फार यशस्वी राहिले आहे असं म्हणताही येणार नाही. त्यातून आज आम्ही अशाच एका स्टारकीडविषयी बोलणार आहोत ज्याचे वडील हे सुपरहीट विलन होते. त्यांच्या अभिनयाचे प्रेक्षक आजही फॅन्स आहे. परंतु त्याचा मुलगाही फार चांगला अभिनेता असला तरीसुद्धा त्याचे करिअर फार यशस्वी राहिलेले नाही. आता एका नव्या चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा आहे. आत्तापर्यंत कदाचित तुमच्या लक्षात आलं असेलच की आम्ही कोणत्या कलाकाराबद्दल बोलत आहोत.
खरंतर त्याच्या लुक्सतीही त्या काळात कॉलेजवयीन मुलींमध्ये चर्चा असायची. सोबतच त्यानं अनेक चित्रपटही केले आहेत. परंतु त्याचे चित्रपट हे फार यशस्वी झालेले नाहीत. तो मध्यंतरी अनेक वर्ष हिंदी चित्रपटसृष्टीतून गायबही होता. आता पुन्हा एकदा तो नव्या प्रोजेक्टमधून कमबॅक करण्याच्या तयारीत आहेत. हा अभिनेता आहे फरदीन खान. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते फिरोज खान यांचा मुलगा फरदीन खान आता 'विस्फोट' नावाच्या क्राईम थ्रीलर चित्रपटातून परत कमबॅक करतो आहे. त्यामुळे सध्या त्याची चर्चा रंगलेली दिसते आहे. अशातच आता चर्चा आहे ती म्हणजे त्याच्या या अपकमिंग चित्रपटाची. त्याचा पहिलाच चित्रपट 'प्रेम आगंन' हा फ्लॉप झाला होता. त्यामुळे त्याची तेव्हा बरीच चर्चा रंगलेली होती. त्यावेळी फिरोज यांनीही कबूल केले होते की त्यांना यशस्वी चित्रपट आपल्या मुलाचा डेब्यू म्हणून करायचा होता पण तसं झालं नाही. आपण आपला सर्व अनुभव यात टाकण्याचा प्रयत्न केला होता परंतु तसं झालं नाही.
त्यातून आता या नव्या चित्रपटातून वयाच्या 49 व्या वर्षी कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. यावेळी त्यानं 'ई टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीनुसार,'' 'विस्फोट' या चित्रपटाची कथा ही 24 तासांत झाली. हा चित्रपट एक क्राईम थ्रीलर आहे. वेनेझ्लुएलाचा चित्रपट 'रॉक पेपर सिझर्स'चा हा रिमेक आहे. मी या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे'', असं तो म्हणाला.
2010 साली आलेल्या 'दुल्हा मिल गया' या चित्रपटातून तो शेवटचा दिसला होता. त्यानं 'हे बेबी', 'ऑल द बेस्ट', 'डार्लिंग', 'जयवीरू', 'लाईफ पार्टनर' अशा चित्रपटांतूनही कामं केली आहेत. त्याचा 'ऑल द बेस्ट' हा चित्रपट हीट झाला.