मुंबई : 'इन आँखों की मस्ती के मस्ताने हजारों हैं'... रेखा यांच्यावर चित्रित केलेलं उमराव जान चित्रपटातील हे गाणं रेखा यांच्या व्यक्तिमत्त्वाचं वर्णन करतं. रेखा यांच्या सौंदर्याचं आणि अभिनयाचे हजारोच नाही तर लाखो चाहते आहेत. पण तरीही त्या आयुष्यभर अविवाहित राहिल्या. त्यांचं नाव अनेक स्टार्सशी जोडलं गेलं पण रेखा यांचं प्रेम कधीच पूर्ण होऊ शकलं नाही.
अधुरी प्रेमाची ही कहाणी बॉलीवूडची कथा बनली जी आजही चर्चेत आहे. आजही त्यांच्या अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या अनोळखी नात्याबद्दल बोललं जातं. रेखा यांचा बालपणीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिला ओळखणं फार कठीण आहे.
मिळालं नाही वडिलांचं नाव
या फोटोमध्ये रेखा खूपच लहान दिसत असून त्यांना दृष्ट लागू नये म्हणून तिच्या गालावर काजळाची टिट लावली आहे. रेखा यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1954 रोजी चेन्नईमध्ये झाला होता. रेखा साऊथ स्टार जेमिनी गणेशन आणि पुष्पावली यांची मुलगी आहे पण तिला तिच्या वडिलांचं नाव मिळालं नाही. वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी रेखा यांनी चित्रपटात काम करायला सुरुवात केली होती पण रेखा यांनी स्वतः बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, चित्रपटांमध्ये काम करणं तिच्यासाठी एक मजबुरी होती. आर्थिक अडचणींमुळे त्यांनी वयाच्या १६ व्या वर्षी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली.
आयुष्यभर अविवाहित राहिल्या
अमिताभ बच्चन यांच्या आधी रेखा यांचं नाव अभिनेते किरण कुमार आणि विनोद मेहरा यांच्यासोबतही जोडलं गेलं होतं, मात्र या दोन्ही स्टार्सचं कुटुंबीय रेखा त्यांच्या घरची सून बनू इच्छित नव्हती. वडिलांच्या नावाची अनुपस्थिती रेखा यांच्या नात्यात आली. त्यानंतर 'दो अंजाने' चित्रपटाच्या सेटवर रेखा आणि अमिताभची प्रेमकहाणी सुरू झाली. दोघांनी एकत्र अनेक चित्रपट केले. अमिताभ यांच्या लग्नानंतरही रेखासोबतचे त्यांचं नातं अफवाच राहिलं. पण एकदा जया बच्चन यांनी रेखा यांना सांगितलं की, ती आपल्या पतीला कधीही सोडणार नाही आणि रेखाने तिच्यापासून दूर जावं. यानंतर रेखा अमिताभपासून दूर गेल्या. पण अमिताभवर मन हरवून बसलेल्या रेखा नेहमीच अविवाहित राहिल्या.