मुंबई : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आज १८ वर्षांची झाली. सुहानाच्या वाढदिवसानिमित्त आई गौरी खानने सुहानाचा एक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केला. गौरी खान आपल्या मुलीला एक जबरदस्त सरप्राईज देण्याची तयारीत असल्याचे दिसते. गौरी खानने हा फोटो शेअर करता करण जोहरचे देखील आभार मानले आहेत.
गौरी खानने शेअर केलेला फोटोत सुहाना खूप सुंदर दिसत आहे. सुहानाला सिनेमात पर्दापण करण्याची इच्छा असल्याचे शाहरुख खानने यापूर्वीच एका मुलाखतीत सांगितले होते. तर सुहानाचा हा फोटो पाहताच कॅमेरा आणि बॉलिवूडसाठी ती पूर्णपणे तयार असल्याचे दिसते.
हा फोटो शेअर करत गौरी खानने लिहिले की, सुहाना लवकरच आपल्या पहिल्या प्रोजेक्टसाठी म्हणजे एका मॅगझीनसाठी शूट करत आहे. मात्र या मॅगझीनचे नाव गुलदस्तातच ठेवण्यात आले आहे.
सिनेमापासून दूर असूनही सुहानाचे फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. सोशल मीडियावर तिचे फॅनपेज आहेत. त्यावरुन तिचे फोटो समोर येत असतात.