मुंबई : सिनेसृष्टीचं लाडकं कपलं म्हणजे अभिनेता रितेश देशमुख आणि जिनीलिया देशमुख. ही जोडी अनेकांची फेवरेट आहे. बऱ्याच वर्षांची मैत्री आणि त्यानंतर लग्न अशी त्यांची प्रेमकहाणी सगळ्यांनाच माहितच आहे. या जोडीचा संसार गुण्यागोविदाने सुरु आहे. मात्र तरीही त्यांच्या प्रेमाची चर्चा नेहमी असते. आता नवीन चर्चा सुरु झाली आहे. रितेश देशमुख आणि जिनीलियाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दोघांचाही सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे. हे कपल कायम सोशल मीडिया त्यांचे व्हिडीओ शेअर करतात. त्यांनी एखादा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाच तर तो अवघ्या काही वेळातच व्हायरल होतो.
आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत सुरुवातीला दोघंही एकमेकांच्या जवळ येतात आणि रितेश म्हणतो, मी नेहमी तुझ्यासोबत खूश राहू ईच्छितो. यावर जिनीलिया म्हणते, यार तु एकदा निर्णय घे, तुला माझ्यासोबत रहायचं आहे की, खुश रहायचं आहे. यानंतर रितेश घाबरल्याचे एक्सप्रेशन देतो. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या दोघांचा ही कॉमेडी स्टाईल चाहत्यांना चांगलीच पसंतीस उतरतेय. रितेश जिनीलिया अनेकदा एकमेकांसोबतचे व्हिडिओ शेअर करुन चाहत्यांचं मनोरंजन करत असतात.
अनेकांनी या कपलच्या व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एकाने कमेंट करत म्हटलंय की, आतापर्यंत सवय झाली असावी. तर अजून एकाने कमेंट करत लिहीलंय की, सर्वात गोंडस जोडी सदैव आशीर्वादित रहो. तर अजून एकाने कमेंट करत लिहीलंय, जखमेच्या ठिकाणी हात लावला. तर अजून एकाने म्हटलंय, सर तुम्ही दोघंही उत्तम विवाहित जोडपे आहात. अनेकांना त्यांचा हा क्यूटनेस आवडला आहे.
रितेश-जेनेलिया या जोडीकडे पाहिले की हे दोघे एकमेकांसाठीच बनले आहेत, असे कोणीही मान्य करेल. या दोघांची प्रेमकहाणीही रंजक आहे. एका सिनेमाच्या सेटवर पहिल्यांदा रितेश आणि जेनेलिया यांची ओळख झाली. रितेश आणि जेनेलिया हे दोघे 2012 मध्ये विवाहबंधनात अडकलेत. त्यांना आता दोन छान मुले आहेत. बॉलिवूडच्या सर्वांत आवडत्या कपल्समध्ये आजही या दोघांचे नाव आघाडीने घेतले जाते.