विराट कोहली पुन्हा बनणार RCB चा कर्णधार? टीमने दिले मोठे अपडेट्स, फॅन्सची उत्सुकतता वाढली

IPL 2025 : आयपीएलमधील लोकप्रिय संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोटातून कर्णधारपदासंदर्भात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे.   

पुजा पवार | Updated: Feb 4, 2025, 01:34 PM IST
विराट कोहली पुन्हा बनणार RCB चा कर्णधार? टीमने दिले मोठे अपडेट्स, फॅन्सची उत्सुकतता वाढली  title=
(Photo Credit : Social Media)

IPL 2025 : इंग्लंड विरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे सीरिजनंतर टीम इंडिया (Team India)  चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दुबईला रवाना होईल. आयसीसी टूर्नामेंटनंतर मार्च पासून लगेचच आयपीएल 2025 (IPL 2025) ला देखील सुरुवात होणार आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनला 21 मार्च पासून सुरुवात होणार आहे. दरम्यान आयपीएलमधील लोकप्रिय संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोटातून कर्णधारपदासंदर्भात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. 

विराट कोहली पुन्हा सांभाळणार RCB चं कर्णधारपद?  

आयपीएल 2025 साठी झालेल्या मेगा ऑक्शनपूर्वी आरसीबीने त्यांचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस याला रिटेन केले नाही तसेच ऑक्शनमध्ये सुद्धा आरसीबीने त्याला खरेदी केले नाही. त्यामुळे आयपीएल 2025 साठी आरसीबीला त्यांच्या नव्या कर्णधाराची घोषणा करावी लागणार आहे. विराट कोहली हा आगामी सीजनमध्ये आरसीबीचे नेतृत्व करू शकतो अशी माहिती काही मीडिया रिपोर्ट्स आणि सोशल मिडीयातून समोर आली होती. दरम्यान आरसीबीचे COO राजेश मेनन यांनी स्पोर्ट्स तकला आरसीबीच्या कर्णधारपदासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. मेनन म्हणाले की, "सध्या आम्ही याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. आमच्या संघात 4 ते 5 लीडर खेळाडू आहेत. कर्णधारपदाबाबत अजून पर्यंत कोणताही विचार झालेला नाही की नक्की कोणाकडे नेतृत्व सोपायचे. आम्ही विचार करू आणि मग एका निर्णयावर पोहोचू".  

हेही वाचा : दिग्गज क्रिकेटर्सच्या लाडक्या लेकी सध्या काय करतात? कोणी अभिनेत्री तर कोणी CA

 

143 सामन्यात कोहलीने केलंय RCB चं नेतृत्व : 

विराट कोहली आयपीएलच्या सुरुवातीपासूनच आरसीबी संघाशी जोडलेला आहे. विराटने अनेक वर्ष संघाचं कर्णधारपद सांभाळलं आहे. 2011 मध्ये त्याने पहिल्यांदा त्याने आरसीबीचे नेतृत्व केले आणि 2021 पर्यंत तो आरसीबीचा कर्णधार होता. त्यानंतर फाफ डु प्लेसिसने काही वर्ष आरसीबीचं कर्णधारपद सांभाळलं. जवळपास 143 सामन्यात कोहलीने RCB चं नेतृत्व केलं आहे. 

सौदी अरेबियात पार पडलं आयपीएल 2025 चं मेगा ऑक्शन : 

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025) या जगप्रसिद्ध टी 20 लीगसाठी 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी सौदी अरेबिया येथे मेगा ऑक्शन पार पडलं. मेगा ऑक्शनमध्ये तब्बल 577 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यापैकी केवळ 182 खेळाडू संघांनी विकेट घेतले. या खेळाडूंना विकत घेण्यासाठी जवळपास 639. 15 कोटी रुपये फ्रेंचायझींनी खर्च केले. यंदाही स्पर्धेत 10 संघांचा सहभाग असणार आहे.