भगवान गडाकडून मुंडेंचा पाठिंबा काढून घेणार? अंजली दमानियांनी पर्दाफाश करत वाढवल्या अडचणी

Anjali Damania: अंजली दमानिया यांनी आज धनंजय मुंडे यांच्यावर थेट आरोप केले आहेत. तसंच, मुंडेंचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे.  

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 4, 2025, 12:15 PM IST
भगवान गडाकडून मुंडेंचा पाठिंबा काढून घेणार? अंजली दमानियांनी पर्दाफाश करत वाढवल्या अडचणी title=
Anjali Damania gives Proof Against Dhananjay Munde and demand resignation

Anjali Damania: अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केले आहेत. धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना त्यांनी पाच गोष्टींच्या खरेदीत घोटाळा केला असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसे पुरावेदेखील त्यांनी दाखवले आहेत. तसंच, मुख्यमंत्र्यांनी मुंडेंचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे. 

धनंजय मुंडे यांच्या कृषीमंत्रीपदाच्या काळात नॅनो युरिआ, नॅनो डीएपी, बॅट्री स्पेअर, मेटाल्डे हाईट आणि कापूस बॅगा यांच्या खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. 'नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीची निर्मिती इस्को नावाची कंपनी करते. नॅनो युरिआची 500 मिलीमीटरची बाटली 92 रुपयांना मिळते. पण धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली हीच बॉटल  220 रुपयांना खरेदी करण्याचे टेंडर काढण्यात आले. त्यावेळी कृषी खात्याने 19 लाख 68 हजार 408 बाटल्या खरेदी केल्या. तर नॅनो डीएपची 269 रुपयांची एक बाटली  590 रुपयांना खरेदी करण्यात आली. तर बॅटरी स्प्रेअरचा बाजारभाव 2496 रुपये असताना कृषी खात्याने एक स्प्रेअर 3425 रुपयांना विकत घेण्यात आला,' असं दमानिया यांनी म्हटलं आहे. 

'पहिल्या टेंडरमध्ये निविदा प्रोसेसला आधी प्रशासकीय मान्यता मिळते नंतर जाहिरात होते मग L1 कॉन्ट्रोक्टर होतो मग त्याला टेंडर मिळते आणि मग वर्क ऑर्डर निघते. पण धनंजय मुंडेंच्या ध्यक्षतेखाली आधी पैसे दिले गेले. ते पण पूर्ण रक्कम. कशासाठी तर कच्चा माल विकत घेण्यासाठी 16 मार्च रोजी संपूर्ण रक्कम दिली आहे. 16 मार्चला पैसे दिले. 30 मार्चला निविदा काढली. बॅटरी स्प्रेअर 28 मार्चला पेसे दिले 5 एप्रिलला निविदा काढली. आधी तुम्ही कच्चा माल घ्यायला पैसे देते आणि मग निविदा काढता. हे महाराष्ट्रात आत्तापर्यंत कोणी ऐकलंच नसेल. काय घाई होती इतके पेसे देण्याची,' असा सवाल दमानिया यांनी केला आहे. 

'नॅनो डीएपी, आणि नॅनो युरियाचे पैसे देऊन टाकले. टेंडरमध्ये करेक्शन करुन माल एखाद्या डिलरकडून या सगळ्या बॉटल्स घेतल्या जातात. प्रत्येक गोष्ट बदलण्यात आली आहे. डिलरचा 50 कोटींचा टर्नओव्हर असेल तो त्यांनी 1 कोटी केला. एखादी निवेदा काढल्यानंतर अनेक गोष्टी होतात. पण त्या झालेल्या दिसत नाहीयेत,' असंही दमानियांनी म्हटलं आहे.

धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा ते मंत्री बनविण्याच्या लायकीचे नाही त्यांच्यावर चौकशी लावा त्यांच्याकडून पैसे वसूल करायला हवे, माझी थेट मागणी आहे धनजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला हवा. आता तरी भगवान गडाने धनंजय मुंडे यांना दिलेला पाठिंबा काढून घ्यावा. भगवान गडावर फोन करून त्यांच्याशी बोलणार आहे. आदरपूरक त्यांना मी बोलणार आहे. त्यांना हे सगळे पुरावे मी दाखवणार आहे. मुंडे यांना दिलेला पाठिंबा काढून गडावरून मुंडे यांचा राजीनामा त्यांनी मागितला पाहिजे, अशी मी विनंती करणार, असंही दमानिया यांनी म्हटलं आहे.