रितेश देशमुखमुळे लग्नानंतर चित्रपटातून ब्रेक घेतला? जिनिलिया म्हणाली...

Genelia Deshmukh : जिनिलिया देशमुख ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. जिनिलियानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेण्याचं कारण काय होतं, याविषयी सांगितलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jul 23, 2023, 02:32 PM IST
रितेश देशमुखमुळे लग्नानंतर चित्रपटातून ब्रेक घेतला? जिनिलिया म्हणाली... title=
(Photo Credit : Social Media)

Genelia Deshmukh : बॉलिवूड अभिनेत्री जिनिलिया डिसुजा ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. जिनिलिया ही सध्या तिच्या 'ट्रायल पीरियड' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. जिनिलियाचा पहिल्यांदा अभिनेता मानव कौल याच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. चित्रपट 21 जुलै रोजी ओटीटीवर प्रदर्शित झाला असून अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. तरी देखील जिनिलिया चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, या सगळ्यात दिलेल्या मुलाखतीत जिनिलियानं लग्नानंतर घेतलेल्या ब्रेकविषयी सांगितले आहे. त्यावर तिनं केलेल्या खुलाशानं अनेकांना धक्का बसला आहे. 

जिनिलियाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिनं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. जिनिलियानं त्यानंतर बॉलिवूडमध्ये जसं काम केलं त्याला पाहून जिनिलिया ही अनेकांच्या हृदयावर राज्य करू लागली होती. दरम्यान, बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखशी लग्न केल्यानंतर जिनिलिया पडद्यापासून लांब गेली. त्यावरून अनेकांनी अनेक गोष्टींवर चर्चा केली. अनेकांना वाटलं की रितेशनं जिनिलियाला चित्रपटांमध्ये काम करण्यास नकार दिला. दरम्यान, आता त्यावर स्वत: जिनिलियानं वक्तव्य केलं आहे. त्यासोबत मोठ्या पडद्यापासून लांब राहण्याचं खरं कारण काय होतं ते देखील सांगितलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

जिनिलिया म्हणाली की या सगळ्या अफवा आहेत. ती म्हणाली की लोक तेच बोलतात जे त्यांना वाटतं. सत्य काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत. जिनिलिया म्हणाली की तिनं स्वत: ठरवलं की तिला अभिनय क्षेत्रापासून लांब रहायचं आहे. कारण तिला तिच्या पती आणि मुलांसोबत असलेल्या आयुष्याचा पूर्ण आनंद घ्यायचा होता. तिला आजही तिच्या पती आणि मुलांसोबत वेळ व्यथित करायला आवडते हे सांगितले. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : लग्नानंतर मीच तडजोड केली; लग्नानंतरच्या आयुष्यावर नेहा पेंडसेचे वक्तव्य चर्चेत

जिनिलियाच्या खासगी आयुष्याविषयी बोलायचे झाले तर ती आणि रितेश 3 फेब्रुवारी 2012 रोजी लग्न बंधनात अडकले. लग्नाच्या दोन वर्षात जिनिलियानं रियानंला जन्म दिला आणि त्याच्या दोन वर्षानंतर राहिलला जन्म दिला. दरम्यान, जिनिलियाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती सगळ्यात शेवटी वेड या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिच्यासोबत तिचा पती अभिनेता रितेश देशमुख मुख्य भूमिकेत होता. तर जिनिलिया सध्या तिच्या 'ट्रायल पीरियड' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात मुलाच्या हट्टासाठी जिनिलिया ट्रायल वडील घेऊन येते. वडील आवडले नाही तर आपण दुसरे आणू असं तिचा मुलगा तिला सांगतो. अशी त्याची एक मजेशीर कहाणी आहे. तर चित्रपटात जिनिलिया आणि मानव कौल शिवाय शक्ती कपूर, शीबा चड्ढा, गजराज राव आणि जिदान ब्रेज हे कलाकार आहेत.