Govinda Niece Somya Seth Second Marriage: अभिनेता गोविंदा आपल्या हटके स्टाईलसाठी कायमच ओळखला जातो. परंतु तुम्हाला माहितीये का की त्याची भाचीही याच क्षेत्रात सक्रिय आहे. सौम्या सेठ असं तिचं नावं आहे. काही वर्षांपुर्वी आलेल्या नव्या या मालिकेतून तिनं हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केले होते. तिच्या अभिनयानं तिनं सर्वांचीच मनं जिंकून घेतली होती. काही वर्षांपुर्वी तिनं अमेरिकेत लग्न केलं परंतु ते फार काम टिकलं नाही. घरगुती हिंसाचाराला कंटाळून तिनं घटस्फोटही घेतला होता. त्यावेळी ती गरोदरही होती. त्यावेळी तिची सोशल मीडियावरून भरपूर चर्चा सुरू झाली होती. आता हीच सौम्या सेठ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिनं दुसरा संसार थाटला असल्याचे बोलले जाते आहे. नक्की तिचा पती आहे तरी कोण याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
नव्या ही मालिका संपल्यानंतर सौम्या फार कमी मालिकांमधून दिसली. परंतु त्यानंतर लोकप्रिय असतानाच तिनं अभिनय सोडून दिला आणि यशाच्या शिखरावर असताना तिनं लग्न केले आणि त्यानंतर ती छोट्या पडद्यावर किंवा रूपेरी पडद्यावर दिसेनाशी झाली. एवढंच नाही तर तिचे पहिले लग्नही फार काळ टिकले नाही. ती आपल्या पहिल्या लग्नापासून गरोदर असतानाच तिचा घटस्फोट झाला. आता जवळपास पाच वर्षांनी तिनं दुसरं लग्न केलं आहे.
2015 मध्ये तिनं अरूण कुमारशी अमेरिकेत लग्न केले होते. त्यानंतर तिला कौंटुबिक आणि मानसिक छळाचा सामना करावा लागला होता. याविषयी समाजमाध्यमांमध्ये खूप चर्चा रंगली होती. त्यानंतर तिनं 2017 मध्ये तिनं घटस्फोटही घेतला होता. या सगळ्या घडामोडींमुळे तिला आत्महत्येचेही विचार आले होते. यातून बाहेर पडण्यासाठी तिनं अनेक प्रयत्न केले होते. तिच्या आईवडिलांनीही तिला मदत केली होती. आता तिनं शुभम चुहाडियाशी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे.
हेही वाचा - सनी देओलची ऑनस्क्रीन बहीण आज अब्जाधीशाची पत्नी; ओळखलं का मराठमोळ्या अभिनेत्रीला?
22 जून रोजी तिनं कुटुंबियांच्या उपस्थितीत शुभमशी ख्रिश्चन पद्धतीनं लग्न केलं आहे. तिनं याबाबतीच एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात तिनं म्हटलंय की, आम्ही आमच्या पालकांना 21 जूनचा एक दिवस दिला होता. त्या दिवशी आमची हळद आणि मेहंदीचा कार्यक्रम पार पडला आणि दुसऱ्या दिवशी 22 जूनला आम्ही आमच्या पद्धतीनं लग्न केलं. आमच्या लग्नात कोणी दुसरे पाहुणे नव्हते. आमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे लोक जसे की आमच्या कुटुंबातील सदस्य आणि फक्त काही मित्रांनाच आम्ही आमच्या लग्नासाठी आमंत्रित केलं होतं.
सौम्याचा नवा नवरा हा चित्तोडगडचा राहणारा आहे. तो आर्किटेक्ट आणि डिझायनर असून तो अमेरिकेत राहतो. कोविडच्या काळात त्या दोघींची पहिली भेट झाली आणि ते एकमेकांच्या जवळ आले. दोघेही जवळपास 3-4 वर्षे म्हणजे कोविडनंतर एकमेकांना डेट करत होते. त्यांना त्यांनी एकमेकांशी लग्नगाठ बांधली आहे. आता ते दोघं सेटल आहेत. सौम्यानं स्वत:चा रियल इस्टेटचा बिझनेस सुरू केला आहे.