Heeramandi Series पाहण्यासाठी उस्तुक असणाऱ्या चाहत्यांना करावी लागणार प्रतिक्षा!

Heeramandi Web Series:  हीरामंडी ही वेब सीरिज पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. पण त्यांना अजून प्रतिक्षा करण्याची वेळ येऊ शकते. खरंतर ही सीरिज भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी वैश्या कशा राहत होत्या, त्यांचे आयुष्य कसे होते हे दाखवण्यात येणार आहे. या सीरिजमध्ये अनेक अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 

दिक्षा पाटील | Updated: May 4, 2023, 05:47 PM IST
Heeramandi Series पाहण्यासाठी उस्तुक असणाऱ्या चाहत्यांना करावी लागणार प्रतिक्षा!  title=
(Photo Credit : Social Media)

Heeramandi Web Series:  लोकप्रिय बॉलिवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे त्यांच्या मोठ्या सेट आणि गाजलेल्या चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्यांनी दिग्दर्शित केलेले 'हम दिल दे चुके सनम' आणि 'देवदास' हे चित्रपट आजही प्रेक्षक पाहतात. त्यात त्यांचे रामलीला असो की मग गंगुबाई सगळेच चित्रपट हे कितीही वेळा पाहिली तरी कोणाला कंटाळ येत नाही. लवकरच संजय लीला भन्साळी हे त्यांची एक वेब सीरिज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेब सीरिजचे नाव 'हीरामंडी' असे आहे. जेव्हा या सीरिजची पहिली झलक पाहायला मिळाली होती तेव्हापासून प्रेक्षक आतुरतेनं या वेब सीरिजची प्रतिक्षा करत आहेत. पण ही सीरिज पाहण्यासाठी आतुर असलेल्या प्रेक्षकांना आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे.  

संजय लीला भन्साळी ही अजूनही हीरामंडी या त्यांच्या सीरिजच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. त्यांना या सीरिजचे चित्रीकरण पावसाळा सुरु होण्याआधी करायचे आहे. रिपोर्ट्सनुसार, या वेब सीरिजचे चित्रीकरण हे गोरेगाव फिल्मी सिटीमध्ये सुरु आहे. लवकरच या सीरिजचे चित्रीकरण संपवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. कारण जून महिन्यात पाऊस सुरू झाला की तो थांबत नाही त्यामुळे चित्रीकरण जर लवकरात लवकर संपलं नाही तर त्याचा परिणाम पाहता या वेब सीरिजच्या चित्रीकरणाला अजून वेळ लागेल.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रिपोर्ट्सनुसार, संजय लीला भन्साळीनं गेल्या वर्षी मिताक्षरा कुमारला दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवली होती. पण आता संजय लीला भन्साळीनं ही जबाबदार स्वत: सांभाळण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून ते सतत सेटवर असतात असे म्हटले जाते. सेट डिझाइन कसा करायला हवा आणि अभिनय करताना कोणते प्रॉप्स वापरावेत या सगळ्या गोष्टींकडे ते बारकाईनं लक्ष देत आहेत. 

संजय लीला भन्साळीची ही सीरिज Netflix या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजचे शेवटच्या काही शूटचं शेड्यूल्ड हे मार्च महिन्यात सुरु झाले आहे. तर गेल्या वर्षाच्या सुरुवातीला या वेब सीरिजच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती. दरम्यान, जर जून महिन्याच्या सुरुवातीपर्यंत वेब सीरिजचं शूटिंग संपलं नाही तर त्यासाठी देखील संजय लीला भन्साळी यांनी केल प्लॅन केला आहे. तो म्हणजे, या प्रोडक्शनच्या महागड्या सेटचं काही नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजच्या सदस्यांना जूनच्या पहिल्या आठवड्यात शेड उभ करायला सांगितलं आहे. 

हेही वाचा : Sunny Deol चा मुलगा करण अडकणार लग्न बंधनात? निवडलाय 'हा' खास मुहूर्त

हीरामंडी या वेब सीरिजमध्ये अनेक बॉलिवूड अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या आहेत. या सीरिजमध्ये मनीषा कोइराला, सोनाक्षी सिन्हा, अदिति राव हैदरी, ऋचा चड्ढा, संजीदा शेख आणि शर्मिन सेगल यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.  या सीरिजमध्ये भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी वैश्यांचे आयुष्य कसे होते हे दाखवणारे आहे. रिपोर्ट्सनुसार, या शोची शूटिंग संपवण्यासाठी संजय लीला भन्साळी यांच्याकडे फक्त दोन महिन्याचा कालावधी आहे. तर ही सीरिज पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे.