'Heeramandi मध्ये आम्ही कोट्यावधींचे खरे दागिने वापरले', रिचाचा खुलासा; म्हणाली, 'मी ते परिधान करून पळाली असती तर..'

Heeramandi : हीरामंडी या संजय लीला भन्साळींच्या सीरिजमध्ये सगळ्या कलाकारांनी वापरे खरे दागिने... अभिनेत्रीनं स्वत: केला खुलासा

दिक्षा पाटील | Updated: May 5, 2024, 10:33 AM IST
'Heeramandi मध्ये आम्ही कोट्यावधींचे खरे दागिने वापरले', रिचाचा खुलासा; म्हणाली, 'मी ते परिधान करून पळाली असती तर..' title=
(Photo Credit : Social Media)

Heeramandi : बॉलिवूडचे लोकप्रिय दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची ‘हीरामंडी’ ही सीरिज काही दिवसांपूर्वीच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. या सीरिजला प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या सीरिजच्या रॉयल सेट, कॉस्ट्यूम आणि ज्वेलरीची सगळीकडेच स्तुती होत आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री रिचा चड्ढानं खुलासा केला आहे की शोमध्ये सगळ्या कलाकारांनी घातलेले दागिने हे खरे होते आणि त्यांची किंमत ही कोटींमध्ये होती. 

सुचरिता त्यागीला एका मुलाखतीत रिचानं सांगितलं की या सीरिजचा भाग होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. सुंदर कपडे आणि सुंदर दागिने, सगळं काही खरं... त्यावरून तिला विचारण्यात आलं की ते दागिने खरे होते का? आणि त्याची किंमत ही कोटींमध्ये होती? रिचा उत्तर देत म्हणाली की हो, सगळे दागिने खरे होते. जर मी हे सगळे दागिने घालून पळून गेले तर मी स्वत: चा आणखी एक चित्रपट बनवू शकेल. फक्त दागिने नाही तर कलाकारांनी परिधान केलेले कपडे देखील खूप महाग होते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कॉस्ट्यूम रिम्पल हरप्रीत नरूला कॉउतरनं हे सगळे कपडे डिझाइन केले होते. याविषयी 'इंडियन एक्सप्रेस डॉटकॉम'ला दिलेल्या मुलाखतीत डिझायनर रिंपलनं सांगितलं की जेव्हा पण आम्ही दिल्लीहून मुंबईला जायचो, तेव्हा भन्साळी कायम आम्हाला शूटिंगचा भाग बनवायचे. त्यांची इच्छा होती की तूम्ही सगळ्या प्रवासाचा भाग झालं पाहिजे. 

रिंपल यांच्याविषयी बोलायचे झाले तर दीपिका पदुकोण, शाहिद कपूर आणि रणवीर सिंगच्या पद्मावतसाठी कॉस्ट्यूम डिझाइन केले होते. हीरामंडी एक पीरियड ड्रामा सीरिज आहे. यात ब्रिटिश राज विरोधातील स्वातंत्र्य आंदोलनाच्या वेळी लाहोरच्या रेड-लाइट परिसर असलेल्या हीरामंडीच्या वेश्यांच्या जीवनावर आधारीत आहे. सीरिजमध्ये मनीषा कोयराला, अदिती राव हैदरी, संजीदा शेख, शेखर सुमन, अध्ययन सुमन, फरदीना खान आणि फरीदा जलाल महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. 

हेही वाचा : 'रामायण' चित्रपटात सीतेच्या भूमिकेत दिसणार 'कच्चा बादाम' फेम अभिनेत्री!

रिचा चड्ढाविषयी बोलायचे झाले तर तिनं फेब्रुवारी महिन्यात तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून प्रेग्नंसीची घोषणा केली होती. तरी देखील ती हीरामंडी या सीरिजच्या प्रमोशनमध्ये उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं.