मुंबई : Vicky Kaushal आणि Katrina Kaif या दोन्ही कलाकारांनी त्यांच्या नात्याबाबत कधीही कोणतंही अधिकृत वक्तव्य केलं नाही. पण, प्रेमाचा हा बहर काही केल्या लपून राहिला नाही. विविध कार्यक्रम असो किंवा मग एखादा पुरस्कार सोहळा, तिथं विकी आणि कतरिनावर अनेकांच्या नजराही खिळल्या होत्या. किंबहुना यादोघांमध्ये होणारी नजरानजरही अनेकांनीच पाहिली.
अशा या जोडीनं म्हणजे आता अगदी खासगी समारंभात साखरपुडा उरकून घेतला आहे. या दोघांच्या नावांनी बरीच हवा केली, किंबहुना ही मंडळी ट्रेंडमध्येही आली. पण, त्यांच्या प्रेमाची ग्वाही यापूर्वीही दिली गेलीये. एकिकडे रिलेशनशिपबाबत (Ralationship) खूप गोपनीयचा पाळत असतानाच दुसरीकडे कतरिना आणि विकीमधील हे खास क्षण मात्र लपून राहिले नाहीत.
हल्ली म्हणे विकीची कतरिनाच्या घरी बऱ्याचदा ये-जा सुरु असते. माध्यमांचे प्रतिनीधी आणि कॅमेरांच्या नजरा चुकवत तो इथं येतो. अभिनेता अनिल कपूर यांचा मुलगा, हर्षवर्धन कपूर यानंही एकदा एका शो वर विकी आणि कतरिना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत, हे खरं आहे का? असा प्रश्न केला होता. इतक्यावरच न थांबता हे असं काहीतरी बोलणं आपल्याला महागात तर पडणार नाही ना, अशी शंकाही त्यानं मांडली होती. तो ज्या आत्मविश्वासानं हे बोलला होता, हे पाहता नक्कीच 'दाल मे कुछ काला हैं...' असं म्हणत अनेकांचे कान टवकारलेले.
कतरिनानं काही दिवसांपूर्वी इन्स्टा स्टोरीमध्ये एक फोटो शेअर केला होता. जिथं तिनं एका व्यक्तीला मिठी मारल्याचं स्पष्ट दिसून आलं होतं. त्यानंतर विकी त्याच रंगाच्या टी-शर्टमध्ये दिसला ज्या रंगाचा टीशर्ट कॅटनं मिठी मारलेल्या व्यक्तीचं घातला होता. तेव्हापासून कतरिनानं मिठी मारलेली व्यक्ती दुसरीतिसरी कोणी नसून विकीच होता अशा चर्चांनी जोर धरला.
इशा अंबानीच्या होळी पार्टीमध्येही विकी आणि कतरिना एकसारख्याच रंगाचा पेहराव करुन आले होते. तर, दुसरीकडे ही जोडी नव्या वर्षाचं स्वागतंही एकत्रच करताना दिसली होती. कतरिनानं पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये समोरील काचेमध्ये विकी स्पष्टपणे दिसला आणि बस्स मग काय, या सेलिब्रिटी कपलच्या रिलेशनशिपच्या चर्चांना आणखी हवा मिळाली होती.