बॉलिवूडला नडणाऱ्या महेश बाबूचं मानधन माहितीये का?

बॉलीवूडला मी परवडणार नाही, असे महेश बाबूला का वाटतं? अखेर साऊथच्या या सुपरस्टारची फी किती आहे?

Updated: May 11, 2022, 09:33 AM IST
बॉलिवूडला नडणाऱ्या महेश बाबूचं मानधन माहितीये का? title=

मुंबईः बॉलीवूड ही काही लहान इंडस्ट्री नाही. बॉलिवूडमध्ये 500 कोटींच्या बजेटमध्ये चित्रपट बनतात. मग बॉलीवूडला तो परवडणार नाही, असे महेश बाबूला का वाटतं? अखेर साऊथच्या या सुपरस्टारची फी किती आहे? पाहुयात

बॉलीवूड विरुद्ध साऊथ इंडस्ट्री हा वाद बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे,  साऊथ सुपरस्टार महेश बाबूच्या एका वक्तव्याने तो आणखी वाढला आहे. चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजदरम्यान महेश बाबूला जेव्हा विचारण्यात आले की ते बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार का, तेव्हा त्यांनी जे उत्तर दिले ते प्रत्येकाच्या कल्पनेपलीकडचं होतं

बॉलीवूडला मी परवडत नाही, त्यामुळे हिंदी चित्रपटांमध्ये काम करून आपला वेळ वाया घालवायचा नाही, या प्रश्नाचे उत्तर महेश बाबू यांनी दिले. महेश बाबूचे हे वक्तव्य येताच इंडस्ट्रीत खळबळ उडाली होती, पण आता सगळ्यांना हे जाणून घ्यायचे आहे की, तो असे का म्हणाला... आणि अनेकांना आता महेश बाबूच्या फीबद्दल जाणून घ्यायचे आहे. 

वयाच्या चौथ्या वर्षापासून अभिनय करत असलेला महेश बाबू आज साऊथ सिनेमाचा सुपरस्टार आहे. त्याने कोणत्याही हिंदी चित्रपटात काम केले नसलं तरी उत्तर भारतातही त्यांची फॅन फॉलोईंग खूप आहे. त्याचे डब केलेले चित्रपट मोठ्या उत्सुकतेने पाहिले जातात. 

46 वर्षांच्या या सुपरस्टारने आतापर्यंतचं संपूर्ण आयुष्य साऊथ इंडस्ट्रीत घालवलं आहे. फीबद्दल बोलायचे झाले तर मीडिया रिपोर्ट्सनुसार महेश बाबूने अलीकडेच त्याची फी खूप वाढवली आहे.

पूर्वी तो एका चित्रपटासाठी 55 कोटी घेत होता, आता तो एका चित्रपटासाठी 80 कोटी रुपये घेतो.. त्यामुळे मी बॉलिवूडला परवडणार नाही हे तो का म्हणाला याचा अंदाज येऊ शकतो. महेश बाबूच्या या वक्तव्यावर आतापर्यंत बॉलिवूडमधून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.