'पार्टी, मद्यपान अन् जबरदस्ती केली..' प्रसिद्ध अभिनेत्रीचा या अभिनेत्यावर गंभीर आरोप

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वक्तव्यानंतर खळबळ माजली आहे. एका शो दरम्यान ही घटना घडली आहे. त्यामुळे सगळीकडे फक्त एकच चर्चा पाहायला मिळत आहे.

Updated: Apr 9, 2023, 10:31 PM IST
'पार्टी, मद्यपान अन् जबरदस्ती केली..' प्रसिद्ध अभिनेत्रीचा या अभिनेत्यावर गंभीर आरोप title=

मुंबई : नेटफ्लिक्सच्या डेटिंग शो 'इन रियल लव्ह' हा शो सध्या सतत चर्चेत आहे. हा शो रणविजय सिंग आणि गौहर खान होस्ट करत आहेत.  आता हा शो अभिनेत्री आणि मॉडेल  साक्षी गुप्तामुळे चर्चेत आला आहे. स्पर्धक साक्षी गुप्ताने  तिच्या सह-स्पर्धकावर गंभीर आरोप केले आहेत. तिने आरोप करत म्हटलं आहे की,   परवानगीशिवाय तिच्या स्पर्धकाने तिला किस केलं आहे.  

'इन रियल लव्ह' या रिअॅलिटी शोमध्ये मॉडेल  साक्षी गुप्तासोबत गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. तिच्या परवानगीशिवाय तिला किस केली असं या मॉडेलचं म्हणणं आहे. तिच्या या वक्तव्यानंतर बराच वाद आता रंगलेला पाहायला मिळत आहे. 

'इन रियल लव्ह'च्या चौथ्या सीझननंतर चांगलीच खळबल माजली आहे.  खरंतर, स्पर्धक साक्षी गुप्ताने आरोप केला की, स्पर्धक वीरेंद्रने तिच्यासोबत हे कृत्य केल्याचं साक्षीचं म्हणणं आहे की, तो तिच्या खांद्यावर  जबरदस्तीने किस करत राहिला. अभिनेत्रीच्या या आरोपानंतर आता वीरेंद्रची प्रतिक्रियाही समोर आली आहे. 

साक्षी आणि वीरेंद्र पूल पार्टीला गेले होते
या शोमध्ये साक्षी आणि वीरेंद्र यांचं कनेक्शन होत होतं.  दोघंही एकमेकांसोबत क्वालिटी टाईम स्पेंण्ड करत असत. दोघंही आधी बोलले की, जर त्यांचे विचार जुळले तर ते हे नातं पुढे नेऊ शकतात. यांनतर एकमेकांच्या संमतीनेच हे दोघं पूल पार्टीला गेले. यादरम्यान दोघेही बोलले, यावेळी त्यांनी एकमेकांसोबत वेल घालवला. दोघांनी एकत्र ड्रिंक केली आणि खूप हंगामा केला.  
 
साक्षीने पुढे सांगितलं की, त्याने तिच्या खांद्यावर विचारायच्या आधी किस केलेलं तिला बिलकुल आवडलं नाही. शोमध्ये दुसऱ्या कंटेस्टेंटसोबत बोलताना म्हणाली की, विरेंद्रने तिला सांगितलं की, त्याने पूल पार्टी दरम्यान तिच्या खांद्यावर किस केली होती. मात्र तिच्या काहिच लक्षात नाही कारण ती नशेत होती. मात्र ती नशेत होती त्यामुळे तिच्या फारसं काही लक्षात नाही. मात्र ती विरेंद्रच्या या कृत्यामुळे खूप सरप्राईज आहे. या प्रकरणानंतर या दोघांमधील असलेलं नातं संपलं आहे.

पुढे विरेंद्र तिच्या या वक्तव्यानंतर व्यक्त होत म्हणाला की, तुम्ही कितीही नशेत असलात तरी, त्यावेळी तुमचा मूड स्विंग नाही होवू शकत. त्यावेळी तुम्ही वेगळ्याच मूडमध्ये असता. आणि तुमचे एक्सप्रेशन बरंच काही सांगून जातात. तुम्ही काही करता आणि आता तुम्ही शुद्धित आहात. मला चुकीचं दाखवलं जात आहे.''