धक्कादायक : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीची फसवणूक; रडत रडत बनवला व्हिडीओ

प्रसिद्ध अभिनेत्रीला नुकत्याच एका वाईट अनुभवांचा सामना करावा लागला. जेव्हा तिची तब्येत बिघडली तेव्हा तिला हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात आलं.

Updated: Dec 10, 2023, 03:12 PM IST
धक्कादायक : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीची फसवणूक; रडत रडत बनवला व्हिडीओ title=

मुंबई : आपल्या परफेक्ट कॉमेडी टाईमिंगसाठी अभिनेत्री  सुबुही जोशी ओळखली जाते. या अभिनेत्रीला नुकत्याच एका वाईट अनुभवांचा सामना करावा लागला. जेव्हा तिची तब्येत बिघडली तेव्हा तिला हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात आलं. अभिनेत्रीने एका लाईव्ह सेशन दरम्यान बीमा कंपनीसोबत तिचा वाईट अनुभव शेअर करत तिच्या चाहत्यांना चाहत्यांना सतर्क केलं आहे.

अभिनेत्री  सुबुही जोशीने नुकत्याच एका बीमा कंपनीविषयी तिची आपबिती सांगितली आहे. यावेळी ती लाईव्ह आली होती. याविषयी बोलताना अभिनेत्री म्हणाली, तिची प्रकृती अस्वास्थ्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, यावेळी तिच्या विमा कंपनीने तिच्या रुग्णालयाचं बिल भरण्यास नकार दिला.

अभिनेत्री म्हणाली की, ''प्रत्येक माणसाला जसं समजावून सांगण्यात येतं की, आरोग्य विम्याचे महत्त्व किती आणि कसं आहे. असंच मलाही सांगितलं गेलं होतं आणि त्यामुळेच मी हा विमा खरेदी केला आणि प्रीमियम भरला. तिने एक या संदर्भातली घटना सांगितली. मात्र नुकतंच तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आणि यावेळी तिला विमा कंपनीने बिल भरण्यास सक्त मनाई केली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

विमा कंपनीने केली फसवणूक
थकबाकी कॅशलेस इन्शुरन्स कार्डद्वारे भरणे हॉस्पिटलचा इरादा होता. मात्र विमा कंपनीने  फॉर्मचा अस्वीकार करत सांगितलं की,  सुबुहीकडे कोणताच इमरजेंसी केस नव्हती. सुबुहीने हे देखील सांगितलं की, हॉस्पिटलने बिमा कंपनीला पुन्हा फॉर्म पाठवला आणि तिला सांगितलं की, हे एक  इमरजंन्सी होती. कारण माझे हार्ट बिट्स वाढत होते. मात्र तरिही विमा कंपनीने या सगळ्या गोष्टीसाठी नकार दिला. 

अभिनेत्री रडत रडत सांगितलं की, यावेळी तिच्यासोबत हॉस्पटलमधील कर्मचारी असभ्य वर्तवणूक करत होते. कारण तिने त्यांना सलाईन काढण्यास सांगितलं कारण तिला त्याचा खूप त्रास होत होता. खूप वेदना होत होत्या. यावर तेथिल कर्मचाऱ्यांनी तिला सांगितलं की, हे तेव्हाच काढलं जाईल जेव्हा तुझं संपुर्ण बिल भरण्यात येईल. अभिनेत्रीने असंही सांगितलं की, जेव्हा तिच्यासोबत हा संपुर्ण प्रकार घडत  होता तेव्हा ती संपुर्णपणे एकटी पडली होती. आणि १० वर्षात पहिल्यांदा तिला असं वाटलं की, मुंबईत तिचं घर नाहीये. कदाचित माझा परिवार माझ्यासोबत या काळात असता.''