मुंबई : जॅकी श्रॉफने मुलगा टायगरची गर्लफ्रेंड दिशा पटानी सोबत 'राधे' या चित्रपटात काम केलं आहे. जरी जॅकी श्रॉफने अनेक वेळा दिशाचे कौतुक केलं आहे. पण अलीकडेच त्याने दिशाशी संबंधित एक मोठा खुलासा केला आहे. एका मुलाखतीत जॅकी श्रॉफने सांगितलं की, कधीकधी तो चित्रपटाच्या सेटवर दिशासाठी जेवण घेऊन जायचा. एवढंच नव्हे तर दिशाही त्यांच्याकडून खास गोष्टींसाठी हट्ट करते.
दिशा आणि टायगर एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत असं म्हणतात. या दोघांच्या अफेअर्सची चर्चा नेमही सुरु असते. मात्र अजूनही या दोघांनी आपल्या नात्याची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाहीये. मात्र हे दोघंही अनेकदा ऐकमेकांसोबत स्पॉट होत असतात. टायगरची बहिण कृष्णा श्रॉफसोबतही दिशाचं खूप छान बॉडिंग आहे.
एका वृत्तानुसार, जॅकी श्रॉफने एका मुलाखतीमध्ये सांगितंल आहे की, दिशा खूप चार्मिंग आहे. तिचे डोळे खूप ईमानदार आहेत. ती खूप सिंपल दिसते पण जेव्हा ती डान्स करते तेव्हा ती खूप एनर्जेटिक आहे. मला माहिती आहे की, तिचे सोशल मीडियावर खूप फॅनफॉलोअर्स आहेत. ही मुलं मी कोण किंवा मी कोण होतो यापलीकडे आहेत. ती खूप शिस्तबद्ध आहे आणि तिच्याकडे कठोर कार्यनीति आहे.
दिशासाठी सेटवर जेवण घेवून जायचे जॅकी श्रॉफ
पुढे ते म्हणाले की, मी सगळ्या महिलांचा आदर करतो. मी सगळ्यांसोबत एक सारखं वागण्याचा प्रयत्न करतो. मग कोणी ज्युनियर असो वा सीनियर मी सगळ्यांसोबत एकसमान वागतो. हाच आदर हीच ईज्जत मी दिशाला देतो. आणि म्हणूनच मी आणि दिशा सेटवर जेवण शेअर करायचो. दिशाला चीट डेला गाठिंया खायला आवडतात. आणि म्हणून मी दिशासाठी सेटवर गाठिंया घेवून जायचो.